पुणे : अजित पवार गटातील आमदार निलेश लंके लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. निलेश लंके आजच शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार होते, मात्र येत्या काही दिवसात नगरमध्ये मोठी सभा होणार असून त्यात लंके प्रवेश करणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे. त्याआधी निलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतल्याने याला अधिक बळ मिळालं आहे. त्यावरून आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी निलेश लंके यांना शरद पवार गटात जाऊ नये म्हणून विनंती करण्यात आलीय.
हेही वाचा…“तु आता कोणत्याही बापाला समोर घेऊन आला तरी पराभव करू”, तानाजी सावंतांचा निंबाळकरांना इशारा
अहमदनगर येथील कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी लंकेंना शरद पवार गटात येण्याची खुली ऑफर दिली होती. त्यानंतर आज निलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली. त्यानंतर लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावर लंके साहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जातेय. दादांची साथ सोडु नका. तुम्हाला इतरांपेक्षा उज्वल राजकीय भविष्य आहे. तुतारी गटाला लोकसभा लढवायची एवढीच हौस असेल तर बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला मैदानात उतरवुन बघा म्हणावं. असं मिटकरी यांनी म्हटलंय.
आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मधून निलेश लंके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीत सुजय विखे पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु निलेश लंके यांनी देखील निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी देखील निलेश लंके यांना महाविकास आघाडीत येण्याची खुली ऑफर दिली होती. तसेच लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवलीच पाहिजे, असे कोल्हे यांनी म्हटले होते. त्यानंतर आता निलेश लंके शरद पवार गटात दाखल होत असून त्यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…रविंद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..”गद्दारांचं नशीब आहे की आज…”
दरम्यान, राष्ट्रवादीत पक्ष फुट पडल्यानंतर निलेश लंके यांनी सुरूवातीला अजित पवारांची साथ दिली. मात्र लंके यांच्या सर्वच कार्यक्रमात शरद पवारांचे फोटो लागलेले दिसून आले. अशातच निलेश लंके नेमकी कोणत्या गटात आहेत ? असा प्रश्न कार्यकर्त्यांना वारंवार पडत होता. मध्यंतरी खासदार कोल्हे यांनी देखील लंकेंना खुली ऑफर दिली होती.
लंके साहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जातेय. दादांची साथ सोडु नका.तुम्हाला इतरांपेक्षा उज्वल राजकीय भविष्य आहे . तुतारी गटाला लोकसभा लढवायची एवढीच हौस असेल तर बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला मैदानात उतरवुन बघा म्हणावं. तुम्ही एक सामान्य आहात म्हणुन विनंती 🙏🏼@_NileshLanke pic.twitter.com/ED9bAZ6KRp
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 11, 2024
READ ALSO :
हेही वाचा..शिंदेंच्या आणखी एका खासदाराचा पत्ता कट होणार ; नाशिकमधून शांतिगिरी महाराज लोकसभेच्या मैदानात ?
हेही वाचा…लोकसभेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे करणार हजारो मराठा उमेदवार ; पुणे जिल्ह्यात ठराव मंजूर
हेही वाचाशिवसेना पित्रा-पुत्रात होणार लोकसभेचा सामना, ठाकरेंनी जाहीर केली ‘या’ नेत्याची उमेदवारी
हेही वाचादोन्ही पवारांना बारामतीत पाडणार, शिंदेंच्या शिवतारेंनी थेट अजित पवारांनाही दिलं चॅंलेज
हेही वाचा…“मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा पूर वाहिला, पण मंत्र्यांनी नाही पाहिला”