नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीव नाशिक येथील शांतिगीरी महाराजांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यातच शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करून शिंदे शांतिगिरी महाराज यांना उमेदवारी देणार का ? याची चर्चा आता सर्वदुर सुरू झाली आहे.
हेही वाचा…रविंद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..”गद्दारांचं नशीब आहे की आज…”
शांतिगिरी महाराज यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यातच आगामी लोकसभा निवडणुक तुम्ही लढवणार का ? यावर ते म्हणाले की, आम्ही जय बाबाजी भक्त परिवार अशी एक समिती नेमली आहे. त्या समितीला निवडणुक लढवायची की नाही याबाबत सगळे अधिकार दिले आहेत. ती समिती याबाबत येत्या दोन ते तीन दिवसात आपला निर्णय घेणार आहेत. अशी प्रतिक्रिया शांतिगिरी महाराज यांनी दिलीय.
जय बाबाजी भक्त परिवार हा लढा राष्ट्रीय हिताचा, संघर्ष राजकारणाचा या माध्यमातून काम करीत आहे. आमच्या समितीचा विचार ज्यांच्यासोबत जुळणार. त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहेत. असे म्हणत आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आम्ही १०० टक्के उतरणार असून त्याची तयारीही आमच्या समिती मार्फत सुरू आहे. तसेच येत्या दोन दिवसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल. असेही महाराज यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना मोठा धक्का, पश्चिम महाराष्ट्रातील ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात परतणार
शांतिगिरी महाराज यांनी घेतलेल्या निर्णयामुळे खासदार हेमंत गोडसे यांची धाकधुक वाढली आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शांतिगिरी महाराज यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात येईल. अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावर अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु महाराज यांना भाजप किंवा शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार अशी खात्रीशीर माहिती सुत्रांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे करणार हजारो मराठा उमेदवार ; पुणे जिल्ह्यात ठराव मंजूर
हेही वाचाशिवसेना पित्रा-पुत्रात होणार लोकसभेचा सामना, ठाकरेंनी जाहीर केली ‘या’ नेत्याची उमेदवारी
हेही वाचादोन्ही पवारांना बारामतीत पाडणार, शिंदेंच्या शिवतारेंनी थेट अजित पवारांनाही दिलं चॅंलेज
हेही वाचा…“मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा पूर वाहिला, पण मंत्र्यांनी नाही पाहिला”
हेही वाचा“तु आता कोणत्याही बापाला समोर घेऊन आला तरी पराभव करू”, तानाजी सावंतांचा निंबाळकरांना इशारा