पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने सत्ताधारी सरकारच्या विरोधात मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभेच्या मावळ, शिरूर, बारामती व पुणे मतदारसंघात हजारो उमेदवार उभे करणार असल्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला आहे. मराठा सकल क्रांती मोर्चा व सकल समाज पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भोईर व्यायामशाळा, चिंचवड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना मोठा धक्का, पश्चिम महाराष्ट्रातील ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात परतणार
मराठा समाजाच्या वतीने सत्ताधारी सरकारच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा ठराव मंजूर केला आहे. या बैठकीसाठी मारूती भापकर, मनोहर वाडेकर, प्रकाश जाधव, सतीश काळे, जीवन बोराडे, धनाजी येळकर, नकुल भोईर, वैभव जाधव, वसंत पाटील, संजय जाधव, अभिषेक म्हसे, सचिन पवार, शिवाजी पाडुळे, गणेश देवराम, ब्रह्यानंद जाधव, अमोल ढोरे, भाऊसाहेब ढोरे, सतीश शेलार, संदीप नवसुपे, औंकार देशमुख, मोहन पवार, राज साळुंखे स्वप्नील परांडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा…१ हजार ५० कोटींच्या विकासकामांचा ‘धम्माका’…,देवेंद्र फडणवीसांनी महेश लांडगे यांना दिले मोठं गिफ्ट
दरम्यान, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने सगेसोयरेबाबतची अधिसुचना काढून आंदोलन स्थगित करायला लावले. अधिसुचनेचे कायद्यात रूपांतर करण्याचे वचन लाखो मराठा आंदोलकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. १६ फेब्रुवारीपर्यंत यावर हरकती मागवल्या. त्याची मुदत संपून तीन आठवडे झआले. मात्र अधिसुचनेचे कायद्यात रूपांतर केले नाही.
READ ALSO :
हेही वाचाशिवसेना पित्रा-पुत्रात होणार लोकसभेचा सामना, ठाकरेंनी जाहीर केली ‘या’ नेत्याची उमेदवारी
हेही वाचादोन्ही पवारांना बारामतीत पाडणार, शिंदेंच्या शिवतारेंनी थेट अजित पवारांनाही दिलं चॅंलेज
हेही वाचा…“मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा पूर वाहिला, पण मंत्र्यांनी नाही पाहिला”
हेही वाचा“तु आता कोणत्याही बापाला समोर घेऊन आला तरी पराभव करू”, तानाजी सावंतांचा निंबाळकरांना इशारा
हेही वाचा…रविंद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..”गद्दारांचं नशीब आहे की आज…”