नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू केली जात आहे. यातच भाजप आणि कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसऱ्या याद्या लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यातच काल भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत ८ राज्यांतील १०० अधिक जागांबाबत चर्चा करण्यात आली. यातच आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी येत्या एक दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…निवडणुकीपुर्वी जळगावात भाजपला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता ठाकरे गटात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा. तर राज्यातून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आदी उपस्थित होते. यातच या बैठकीत मध्य प्रदेश, महाराष्ट्र., गुजरात, कर्नाटक, बिहार, हिमाचल प्रदेश आमि चंदीगड आदी राज्यांच्या जागांसाठी कुठला उमेदवार योग्य राहिल, याबाबत विचारमंथन करण्यात आले.
हेही वाचा…तटकरे, धनंज मुंडे, यांच्यासह राष्ट्रवादीचा एक गट भाजपात प्रवेश करणार, अजित पवारांना मोठा धक्का ?
तीन तास चालेल्या बैठकीत महाराष्ट्रातून काही जागांवरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, भारती पवार यांची नावं जाहीर होऊ शकतात. तर महाराष्ट्र, आंध्रप्रदेष गुजरात, बिहार, मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल आणि हरियाणाच्या ९९ जागांच्या उमेदवारांवरही चर्चा झालीय. १३ मार्चनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर भाजपची दुसरी यादी जाहीर होऊ शकते.
READ ALSO :
हेही वाचा…“ज्या दिवशी भाजपला धोका देईल, त्या दिवशी….” महादेव जानकरांनी पुन्हा भाजपला दिला इशारा
हेही वाचाशिंदे साहेब शिवतारेंना आवरा, अजित पवारांवर केलेली टिका राष्ट्रवादीला भोवली
हेही वाचा.मराठा आंदोलनाबाबत SIT स्थापन, नाशिकचे पोलिस आयुक्त करणार चौकशी, महत्वाची माहिती येणार समोर
हेही वाचा…ठाकरेंची सांगलीत ताकद वाढली, डबल महाराष्ट्र केसरी ठाकरे गटात दाखल, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
हेही वाचा..‘निवडणुकीला उभं राहू नका, भाजपकडून विरोधी नेत्यांना धमकी,” शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप