नाशिक : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यावरून आता नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली आता चौकशी केली जाणार आहे. यासंदर्भात आज राज्य सरकारने परिपत्रक काढले जाणार असून चौकशीअंती काय माहिती समोर येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार ? तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“लंकेसाहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जातेय”, शरद पवार गटात पक्ष प्रवेशावर अजित पवार गटाची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांना कोणी आर्थिक मदत केली ? जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळी दगड कुठून आलेत? त्यांच्याशी कोण कोणाचा संपर्क झाला ? या अशा अनेक मुद्दांवरून भाजपच्या आमदारांनी विधिमंडळात गदारोळ माजवला होता. तर यासर्व आंदोलनाबाबत एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्यात येईल आणि त्यांच्या मार्फत चौकशी केली जाईल असे म्हटले होतं. त्यानंतर आज याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या आणखी एका खासदाराचा पत्ता कट होणार ; नाशिकमधून शांतिगिरी महाराज लोकसभेच्या मैदानात ?
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात यावरून मोठा गदारोळ बघायला मिळाला होता. तर मनोज जरांगे पाटलांना शरद पवार यांनी मदत केल्याचाही आरोप भाजपच्या आमदाराने केला होता. त्यामुळे या आंदोलनाच्या पाठीमागे नेमका कुणाचा हात आहे ? याची लवकरच माहिती समोर येणार आहे. त्याआधी मनोज जरांगे पाटील याबाबत आता काय भूमिका घेणार ? ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंची सांगलीत ताकद वाढली, डबल महाराष्ट्र केसरी ठाकरे गटात दाखल, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
हेही वाचा..‘निवडणुकीला उभं राहू नका, भाजपकडून विरोधी नेत्यांना धमकी,” शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप
हेही वाचा…निवडणुकीपुर्वी जळगावात भाजपला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता ठाकरे गटात दाखल
हेही वाचा.तटकरे, धनंज मुंडे, यांच्यासह राष्ट्रवादीचा एक गट भाजपात प्रवेश करणार, अजित पवारांना मोठा धक्का ?
हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांचा प्राधिकरण परतावा प्रश्न अखेर सुटला, महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश