पुणे : लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा न झाल्याने हरियाणा राज्यात भाजपसोबत असलेल्या जननायक जनता पार्टीने आपला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे हरियाणाचे भाजपचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपला मोठा फटका बसला आहे. तर राज्यात जागावाटपाबाबत महायुतीतील नेते सातत्याने दिल्ली वाऱ्या करतांना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महायुतीवर निशाणा साधलाय.
हेही वाचा…शिंदे साहेब शिवतारेंना आवरा, अजित पवारांवर केलेली टिका राष्ट्रवादीला भोवली
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हरियाणात मित्र पक्ष असलेल्या जननायक जनता पार्टीने भाजपकडे लोकसभेसाठी जागांची मागणी केली होती. मात्र भाजपने ही मागणी मान्य न केल्याने दुष्यांत चौटाला यांनी आपल्या पक्षाचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर हरियाणात भाजपसोबत असलेलं राज्य कोसळलं. त्यानंतर आज मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपविला आहे.
हेही वाचा….मराठा आंदोलनाबाबत SIT स्थापन, नाशिकचे पोलिस आयुक्त करणार चौकशी, महत्वाची माहिती येणार समोर
तर राज्यात महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गट जागावाटपासाठी सातत्याने दिल्लीला जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी गाठीभेटी घेतांना दिसत आहेत. यावरूनच हरयाणा राज्यात भाजप आणि जेजेपी पक्षाचं सरकार होतं. भाजपने जेजेपी पार्टीला सन्मानजनक जागा सोडण्यास नकार दिला. जेजेपीने ताबडतोब सरकारचा पाठिंबा काढून घेतला. , असा खोचक टोला प्रशांत जगताप यांनी महायुतीला लगावला.
हरयाणा राज्यात भाजप आणि जेजेपी पक्षाचं सरकार होतं.. भाजपने जेजेपी पार्टीला सन्मानजनक जागा सोडण्यास नकार दिला.
जेजेपी ने ताबडतोब सरकारचा पाठिंबा काढून घेतला..!
तिकडे एवढासा पक्ष स्वाभिमान दाखवतो, अन इकडे लोक मुंबई ते दिल्ली विमानाचा डेली पास काढून बसलेत.— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) March 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“लोकसभेपुर्वी मोठा भुंकप, ‘या’ राज्यात भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा, राजकीय हालचाली वाढल्या”
हेही वाचा…“अजित पवारांवर केलेली टिका शिवतारेंच्या जिव्हारी.,” महायुतीच्या नेत्यांकडून शिवतारेंना दिली समज
हेही वाचा…“सरकारकडून महिलांची कुचेष्ठा, फुकडच्या साड्या दिल्या पण…” विरोधकांकडून संताप
हेही वाचाभाजपची दुसरी यादी..! लोकसभेसाठी मुंडे, मुनगंटीवार अन् भारती पवारांच्या नावांची घोषणा होणार ?
हेही वाचा…“ज्या दिवशी भाजपला धोका देईल, त्या दिवशी….” महादेव जानकरांनी पुन्हा भाजपला दिला इशारा