नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पुर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपची सत्ता असलेल्या हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. हरियाणा राज्यात जननायक जनता पार्टी यांच्यासोबत असलेली आघाडी भाजपने तोडली असल्याची माहिती समोर येत आहे. एकूण ९० विधानसभा आमदारांच्या संख्याबळ असलेल्या राज्यात अल्पमतासाठी ४५ आमदारांची गरज आहे. त्यामुळे याठिकाणी आता कुणाचं सरकार स्थापन होणार त्याची उत्सुकता लागून राहिलीय.
हेही वाचा….मराठा आंदोलनाबाबत SIT स्थापन, नाशिकचे पोलिस आयुक्त करणार चौकशी, महत्वाची माहिती येणार समोर
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपाबाबत दोन्ही आघाड्यांमध्ये एकमत न झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळेच दुष्यंत चौटाला यांची जेजेपीशीने भाजपशी युती तोडली आहे. यातच आता भाजपकडे ४१ आमदार असून बहुमतासाठी पाच आमदारांची गरज आहे. त्याआधी मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपविला आहे. तर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…ठाकरेंची सांगलीत ताकद वाढली, डबल महाराष्ट्र केसरी ठाकरे गटात दाखल, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
दरम्यान, दुष्यांत चौटाला यांच्या पक्षाचे दहा आमदार निवडून आले होते. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर यामध्ये ७ अपक्ष आमदार होते. परंतु लोकसभेसाठी जेजीपीने लोकसभेसाठी काही जागांची मागणी केली होती. परंतु ती मागणी भाजपने मान्य केली नसल्याने आपला पाठिंबा काढून घेतल्याची माहिती समोर येत आहे. यातच दुष्यांत चौटाला यांनी दिल्लीत आपल्या पक्षाची एक महत्वाची बैठक बोलवली. परंतु यावेळी त्यांचेच आमदार उपस्थित नसल्याचे दिसून आले आहे.
यातच सात अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपने आपण सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली असून आजच मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. तर भाजपकडून नायबसिंह सैनी हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील का ? अशी चर्चाही सध्या सुरू झालीय.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांवर केलेली टिका शिवतारेंच्या जिव्हारी.,” महायुतीच्या नेत्यांकडून शिवतारेंना दिली समज
हेही वाचा…“सरकारकडून महिलांची कुचेष्ठा, फुकडच्या साड्या दिल्या पण…” विरोधकांकडून संताप
हेही वाचाभाजपची दुसरी यादी..! लोकसभेसाठी मुंडे, मुनगंटीवार अन् भारती पवारांच्या नावांची घोषणा होणार ?
हेही वाचा…“ज्या दिवशी भाजपला धोका देईल, त्या दिवशी….” महादेव जानकरांनी पुन्हा भाजपला दिला इशारा
हेही वाचाशिंदे साहेब शिवतारेंना आवरा, अजित पवारांवर केलेली टिका राष्ट्रवादीला भोवली