पुणे : मागील काही महिन्यांपासून नाराज असलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज अखेर मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. पक्षांतर्गत कुरघोडीमुळे मनसेचा राजीनामा देत असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले आहे. तर आपल्या राजकारणाची पुढील भूमिका येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर करणार असल्याची प्रतिक्रिया मोरे यांनी सांगितले आहे. यातच आता एकवेळच्या सहकारी असलेल्या आणि सध्या अजित पवार गटात असलेल्या रूपाली पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा..भाजपची दुसरी यादी..! लोकसभेसाठी मुंडे, मुनगंटीवार अन् भारती पवारांच्या नावांची घोषणा होणार ?
लोकांच्या हक्कासाठी हातोडा घेऊन जाणारा नेता हतबल झालेला पाहून मला वाईट वाटलं आहे. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नेत्यांच्या स्वत: च्या राजकीय स्वार्थासाठी कण्यासहित मोडून टाकला जातो. वसंत मोरे भाऊ तुझी लढाई चालू ठेव ; तुझ्यासाठी बहिनीचे दरवाजे कायम उघडे आहेत. असे म्हणत लोकांची पसंत मोरे वसंत असे म्हणत लवकरात लवकर निर्णय घे असेही रूपाली पाटील यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“ज्या दिवशी भाजपला धोका देईल, त्या दिवशी….” महादेव जानकरांनी पुन्हा भाजपला दिला इशारा
पक्ष संघटना वाढीसाठी गेली १८ वर्ष काम केलंय. परंतु अलिकडे पुण्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्याविरोधात पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण सुरू आहे. माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्न माझ्यासाठी खुप वेदनादायी होते. सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबवले जात आहेत. सध्या तरी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाहीय. परंतु येत्या काही दिवसांत राजकारणाची पुढील वाटचाल स्पष्ट करणार आहे. सध्या तरी निवडणुक लढविण्याबाबत विचार केला नाही. परंतु याबाबत येत्या काही दिवसात निर्णय घेणार असेही वसंत मोरे यांनी म्हटले आहे.
लोकांच्या हक्कासाठी हातोडा घेऊन जाणारा नेता हतबल झालेला पाहून मला वाईट वाटतं आहे.
कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नेत्यांच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कण्यासहित मोडून टाकला जातो.
— Rupali patil thombare (@Rupalispeak) March 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा.मनसेने पुण्यातला हिरा गमावला..! वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र
हेही वाचा…हरियाणात मोठा भुंकप..! तिकडे एवढासा पक्ष स्वाभिमान दाखवतो, अन् इकडे लोक मुंबई ते दिल्ली विमानाचा डेलीपास काढून बसलेत
हेही वाचा..“लोकसभेपुर्वी मोठा भुंकप, ‘या’ राज्यात भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा, राजकीय हालचाली वाढल्या”
हेही वाचा…“अजित पवारांवर केलेली टिका शिवतारेंच्या जिव्हारी.,” महायुतीच्या नेत्यांकडून शिवतारेंना दिली समज
हेही वाचा…“सरकारकडून महिलांची कुचेष्ठा, फुकडच्या साड्या दिल्या पण…” विरोधकांकडून संताप