पुणे : मागील काही महिन्यांपासून नाराज असलेल्या माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्यासारखा हिरा गमावल्यानंतर मनसेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी सकाळीच एक नाराजीची फेसबुक पोस्ट टाकली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन अखेर जय महाराष्ट्र असे म्हणून मनसेला सोडचिठ्ठी दिलीय.
हेही वाचा…“ज्या दिवशी भाजपला धोका देईल, त्या दिवशी….” महादेव जानकरांनी पुन्हा भाजपला दिला इशारा
पक्ष संघटना वाढीसाठी गेली १८ वर्ष काम केलंय. परंतु अलिकडे पुण्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्याविरोधात पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण सुरू आहे. माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्न माझ्यासाठी खुप वेदनादायी होते. सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबवले जात आहेत. सध्या तरी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाहीय. परंतु येत्या काही दिवसांत राजकारणाची पुढील वाटचाल स्पष्ट करणार आहे. सध्या तरी निवडणुक लढविण्याबाबत विचार केला नाही. परंतु याबाबत येत्या काही दिवसात निर्णय घेणार असेही वसंत मोरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…शिंदे साहेब शिवतारेंना आवरा, अजित पवारांवर केलेली टिका राष्ट्रवादीला भोवली
दरम्यान, वसंत मोरे यांनी काल एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी असे म्हटलं होतं की, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खुप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. अशी पोस्ट केली होती. त्यानंतर आज थेट मनसेला जय महाराष्ट्र केलाय. त्यामुळे वसंत मोरे यांच्या रूपाने मनसेने पुण्यातला हिरा गमावला असल्याची भावना आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
काही दिवसांपुर्वी वसंत मोरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर वसंत मोरे राष्ट्रवादी शरदपवार गटात प्रवेश करणार का ? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यातच वसंत मोरे यांना शहाराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर त्यांना विविध पक्षांकडून ऑफर आल्या होत्या. परंतु त्यावेळेस वसंत मोरे यांनी मनसेतच राहण्याचा निर्णय घेतला होता. यातच आता कोणत्या पक्षात जाणार याबाबत येत्या काही दिवसात स्पष्ट करणार असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…हरियाणात मोठा भुंकप..! तिकडे एवढासा पक्ष स्वाभिमान दाखवतो, अन् इकडे लोक मुंबई ते दिल्ली विमानाचा डेलीपास काढून बसलेत
हेही वाचा..“लोकसभेपुर्वी मोठा भुंकप, ‘या’ राज्यात भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा, राजकीय हालचाली वाढल्या”
हेही वाचा…“अजित पवारांवर केलेली टिका शिवतारेंच्या जिव्हारी.,” महायुतीच्या नेत्यांकडून शिवतारेंना दिली समज
हेही वाचा…“सरकारकडून महिलांची कुचेष्ठा, फुकडच्या साड्या दिल्या पण…” विरोधकांकडून संताप
हेही वाचाभाजपची दुसरी यादी..! लोकसभेसाठी मुंडे, मुनगंटीवार अन् भारती पवारांच्या नावांची घोषणा होणार ?