चंद्रपुर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळवण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करतांना दिसत आहेत. परंतु भाजपचे विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार तिकीट मिळू नये म्हणून प्रार्थना करीत आहेत. यातच चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार आणि माजी खासदार बाळु धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात चांगलाच चर्चेचा ठरला आहे.
हेही वाचा..संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडे..! ठाकरेंकडून थेट प्रचार करण्यास सुरूवात, उद्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
पक्षाच्या गटबाजीमुळे आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. यातच गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिभा धानोरकर कॉंग्रेस सोडून भाजपकडून निवडणुक लढविणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यावर मी कॉंग्रेसची, अन् कॉंग्रेसच्याच तिकीटावर निवडणुक लढणार असेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे चंद्रपुरात कॉंग्रेसच्या आत काय चालू आहे ? याची सध्या चर्चा सुरूय.
प्रतिभा धानोरकर यांनी याबाबत सविस्तर माहिती पत्रक देखील काढलं आहे. त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार अशा अशायाच्या अफवा खोडसळपणे पसरवून सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलीत करून कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्याचे प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. मी आणि माझा पक्ष अशा अफवा आणि अफवांचे सुत्रधार यांना भीक घालत नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“‘मी माझ्या स्वत:च्या हातांनी परतीचे दोर कापले’” वसंत मोरे पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले
दरम्यान, स्व. बाळूभाऊंच्या अकाली जाण्याने पोरक्या झालेल्या मतदार बंधू भगिनींच्या न्याय हक्कांसाठी त्यांची पाठराखण करण्याची भूमिका पार पडत आहे. मला आशा आहे की माझा राजकीय हक्क कॉंग्रेस पक्ष मला नक्की देणार. या संवेदनशील काळात आपण सर्वांनी मला आत्मिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर आधार दिला आणि माझ्यावर विश्वास ठेवला याबाबत मी आपण सर्वांची ऋणी असल्याचेही त्यांनी म्हटले.
मी काँग्रेसची,काँग्रेसच्याच तिकीटावर लढणार!#PratibhaDhanorkar #Chandrapur #Loksabha2024 #Yavatmal #congress #BharatJodoNayaYatra #लेक_यवतमाळची_सून_चंद्रपूरची pic.twitter.com/mJEF3MFCfg
— MLA Pratibhatai Dhanorkar (@mlapratibhatai) March 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा..श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर, महायुतीत पेच वाढला, भाजप काय निर्णय घेणार ?
हेही वाचा…“राष्ट्रवादीकडून श्रीरंग बारणेंची कोंडी, मावळवर राष्ट्रवादीचा दावा, कार्यकर्ते सरसावरले”
हेही वाचा…“शिवतारेंना आवरा नाहीतर कल्याणमध्येही चित्र दिसेल”, शिंदे अन् अजित पवार गटाचे नेते एकमेकांत भिडले
हेही वाचा“आधी भ्रष्टाचारी म्हणत होते, त्यांनी मोदींना राखी बांधली”, ठाकरेंनी भावना गवळींसह भाजपचा घेतला समाचार
हेही वाचा…“शरद पवारांकडून ‘वसंत मोरें’नी मार्गदर्शन घेतलं असेल तर चुकीचे काय ?”