यवतमाळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद मेळाव्याची सुरूवात केली आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जाऊन ठाकरे भाजपसह मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत आहेत. यातच आज यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे ठाकरेंनी जनसंवाद साधला. यावेळी त्यांनी यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर जोरदार टिक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेतला.
हेही वाचा…हरियाणात मोठा भुंकप..! तिकडे एवढासा पक्ष स्वाभिमान दाखवतो, अन् इकडे लोक मुंबई ते दिल्ली विमानाचा डेलीपास काढून बसलेत
यवतमाळ-वाशिमच्या खासदारांना ज्या जनतेने निवडून दिले त्यांनी केवळ शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही, तर मतदारांशी केलेली ती गद्दारी आहे. – मोदींना वाटतं, यवतमाळमध्ये सभा घेतली तर जिंकतो. पण ते आता शक्य नाही. इथल्या खासदार ज्या भ्रष्टाचारी असल्याचं भाजपवाले सांगत होते, त्यांनी मोदींना राखी बांधली. मग त्या प्रामाणिक आहेत का? असा सवाल करत भावना गवळी यांच्यावर जोरदार टिका केली.
मला शेतीतलं फार कळत नाही, मला फक्त शेतकऱ्यांचे अश्रू दिसतात, आणि ते मला पुसायचे आहेत. इथल्या दाभाडीचे शेतकरी जेव्हा मोदींना भेटायला गेले तेव्हा त्यांना मोदींनी भेट नाकारली. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव कसा मिळेल ह्याबाबत मी योजना आणत होतो, पण गद्दारांनी सरकार पाडलं. – मी देशातील लुटारुंच्या, हुकूमशहांच्या विरोधात मैदानात उतरलो आहे. असेही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा…“लोकसभेपुर्वी मोठा भुंकप, ‘या’ राज्यात भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा, राजकीय हालचाली वाढल्या”
दरम्यान, एक खासदार तिकडे गेल्या आहेत. त्यांच्यावर भाजपचं भ्रष्टाचाराचे आरोप कोण करत होता ? मोदींना राखी बांधणारी खासदार प्रामाणिक आहे का ? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. भावना गवळी यांचा स्वीय सहायक तुरूंगात होता. प्रामाणिक असेल त्याला आत्महत्या करण्याचं बक्षीस देत आहात आणि भ्रष्टाचारी असेल त्याला शिक्षा देऊन त्यांच्याकडून राखी बांधून घेत आहेत. अन् तिची राखणादारी मोदी तुम्ही करत आहेत. हा शिक्षा आणि बक्षिसमधला फरक आहे का ? असा सवालही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांकडून ‘वसंत मोरें’नी मार्गदर्शन घेतलं असेल तर चुकीचे काय ?”
हेही वाचा..संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडे..! ठाकरेंकडून थेट प्रचार करण्यास सुरूवात, उद्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
हेही वाचा…“‘मी माझ्या स्वत:च्या हातांनी परतीचे दोर कापले’” वसंत मोरे पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले
हेही वाचा“वसंत मोरे भाऊ तुझी लढाई चालू ठेव ; तुझ्यासाठी बहिनीचे दरवाजे कायम खुले,” रूपाली पाटलांची पोस्ट व्हायरल
हेही वाचा.मनसेने पुण्यातला हिरा गमावला..! वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र