नंदुरबार : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये दाखल झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतला आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण आदी उपस्थिती होते.
हेही वाचा…“शिवतारेंना आवरा नाहीतर कल्याणमध्येही चित्र दिसेल”, शिंदे अन् अजित पवार गटाचे नेते एकमेकांत भिडले
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडतांना दिसत आहेत. यातच आज माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यासोबत प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख, प्रदेश सचिव अर्चनाताई राठोड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला अनेक जण सोडून जात असतांना धक्क्यावर धक्के बसत आहेत.
हेही वाचा…“आधी भ्रष्टाचारी म्हणत होते, त्यांनी मोदींना राखी बांधली”, ठाकरेंनी भावना गवळींसह भाजपचा घेतला समाचार
पद्माकर वळवी हे नंदुरबारमधील शहादा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे माजी आमदार असून त्यांच्याकडे राज्याच्या क्रीडा खात्याचीही जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा ते मंत्री होते. नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या बड्या चेहऱ्यापैकी वळवी यांची ओळख राहिलीय. २०९ मध्ये ते शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र २०१४ साली त्यांचा पराभव झाला होता. यातच त्यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पदही सांभाळले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार ;” नाशिकसाठी शांतिगिरी महाराजांनी शड्डू ठोकला
हेही वाचा..“सातारा आपलाच, कामाला लागा,” अजित पवारांनी लोकसभेसाठी कार्यकर्त्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
हेही वाचा…“मी कॉंग्रेसची, अन् कॉंग्रेसच्याच तिकीटावर निवडणुक लढणार”, चंद्रपुरात कॉंग्रेसमध्येच पेच वाढला
हेही वाचा..श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर, महायुतीत पेच वाढला, भाजप काय निर्णय घेणार ?
हेही वाचा…“राष्ट्रवादीकडून श्रीरंग बारणेंची कोंडी, मावळवर राष्ट्रवादीचा दावा, कार्यकर्ते सरसावरले”