बारामती : बारामती हा कुणाचा सातबारा नाही, आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही पवारांना पाडणार, असे जाहिर वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केले होते. त्यानंतर महायुतीच चांगलाच तणाव निर्माण झाला होता. यातच आज विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शिवतारे तुम्ही माघार घेऊ नका, निवडणुक लढवा, असा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार आता बारामतीत लोकसभा निवडणुकीसाठी विजय शिवतारे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असे त्यांनीच जाहिर केलं आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसापासून बारामतीबाबत माझं मत मांडत आहेत. त्याच अनुषंगाने आज कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत आपण निवडणुक लढलीच पाहिजे, असे सगळ्यांनी मत मांडलं आहे. राजकारणाचा भाग म्हणून २०१९ च्या निवडणुकीत अजित पवारांच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता. परंतु अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली. त्यानंतर २३ दिवस लिलावती रूग्णालयात अडमिट होतो. मला बायपास करायला सांगितलं होतं. मी केलं नाही. संपुर्ण रूग्णालयातच माझा प्रचार झाला होता. यातच मरायला लागला आहे तर कशाला निवडणूक लढवताहेत. असे भर सभेत अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यावेळी अजित पवार खालच्या स्तरावर येऊन तु कसा निवडून येतो. तेच मी बघतो असे म्हणाले होते.
हेही वाचा…“राष्ट्रवादीकडून श्रीरंग बारणेंची कोंडी, मावळवर राष्ट्रवादीचा दावा, कार्यकर्ते सरसावरले”
यातच महायुतीत निवडून आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यासाठी गेलो होतो. परंतु ते अतिशय उर्मटपणाने वागत आले आहेत. त्या उर्मटपणाबाबत बारामतीत फिरल्यानंतर सगळ्याच लोकांनी अजित पवारांच्या विरोधात प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळेंना मतदान करणार असल्याचं सांगितलंय. यातच बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात मतदान करणारा वर्ग मोठा आहे. त्यांची पवारांना मतदान करण्याची मानसिकताच नाही. असेही विजय शिवतारे म्हणाले.
हेही वाचा…“शिवतारेंना आवरा नाहीतर कल्याणमध्येही चित्र दिसेल”, शिंदे अन् अजित पवार गटाचे नेते एकमेकांत भिडले
अजित पवारांची क्रिडिबिलीटी आधीच संपलेली आहे. आजच्या घडीला काय परिस्थिती आहे, ती सर्वांना माहिती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाही मानणाऱ्या घराणेशाहीला, कुटुंबशाहीला साम्राज्यवाद्याला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदाराला मतदानाचा अधिकार मिळावा, त्यामुळे ही निवडणुक मी लढणार म्हणजे लढणार असे विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे. पवार विरूद्ध बारामती मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस अशी लढाई असणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
पवारांनी सगळ्यांना त्रास दिला आहे. भोरचे थोपटे एकवेळ मुख्यमंत्री झाले असते. निव्वळ पुण्यामध्ये आमच्या साम्राज्याला हादला बसेल म्हणून त्यांना पाडण्यात आलं. महाविकास आघाडीमध्ये संग्राम थोपटे यांना मंत्री होऊ दिलं नाही. त्यांना विधानसभा अध्यक्ष पद मिळत असतांना अजित पवारांनी त्यांना मिळवू दिलं नाही. लोकसभेला हर्षवर्धन पाटील यांच्याकडून मतदान करून घ्यायचं अन् विधानसभेला त्यांना धक्का लावून द्यायचं. अशा प्रकारची फसवेगिरी अजित पवारांनी केलीय. असा आरोपही त्यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचाइकडे राहुल गांधींची भारत जोडो महाराष्ट्रात ; तिकडे कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला
हेही वाचा…“तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार ;” नाशिकसाठी शांतिगिरी महाराजांनी शड्डू ठोकला
हेही वाचा..“सातारा आपलाच, कामाला लागा,” अजित पवारांनी लोकसभेसाठी कार्यकर्त्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
हेही वाचा…“मी कॉंग्रेसची, अन् कॉंग्रेसच्याच तिकीटावर निवडणुक लढणार”, चंद्रपुरात कॉंग्रेसमध्येच पेच वाढला
हेही वाचा..श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर, महायुतीत पेच वाढला, भाजप काय निर्णय घेणार ?