बारामती : महायुतीतून बारामतीची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार निवडणुक लढविणार असल्याचं जवळपास निश्चिच झालं आहे. तर आज शिवसेना शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दोन्ही पवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार अशी घोषणा केली आहे. बारामतीत तिरंगी लढत होणार असंही आता सांगितलं जात आहे. त्यात अजून एका नावाची भर पडली आहे. भाजपच्या सातारा जिल्हा सचिव पदावरून मुक्त होऊन ओबीसी चेहरा म्हणून अॅड. प्रियदर्शनी कोकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीची लढत आता अधिकधिक रंगतदार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर, महायुतीत पेच वाढला, भाजप काय निर्णय घेणार ?
विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात जवळपास सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. यातच आता मुळच्या बारामतीमधील पणदरे गावच्या ‘प्रियदर्शनी कोकरे’ यांनी भाजपच्या सातारा जिल्हा सचिव पदातुन मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वच पक्षांनी, धनगर,ओबीसी समाज आरक्षण प्रश्नांसाठी ठाम भूमिका न घेतल्यामुळे, ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे, सर्वच पक्षांनी ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे म्हणून राजीनामा देत आहे, बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे प्रियदर्शनी कोकरे यांनी सांगितले. नुकतीच त्यांनी मुंबई येथे ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांची भेट घेतली होती.
हेही वाचा…“राष्ट्रवादीकडून श्रीरंग बारणेंची कोंडी, मावळवर राष्ट्रवादीचा दावा, कार्यकर्ते सरसावरले”
कोकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर आपली छाप पाडली आहे, गेल्या दोन वर्षांपासून त्या भाजपच्या सातारा जिल्हा सचिव म्हणून कार्यरत होत्या उत्कृष्ठ भाषण कौशल्य फायर ब्रँड नेत्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत, देवेंद्र फडणवीस, आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थिती मध्ये दोनवर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मुळच्या बारामती तालुक्यातील पणदरे येथील आहेत यशवंत सेनेचे संस्थापक स्व :- बीके कोकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी माढा,आणि बारामती लोकसभेत निवडणुक लढवली होती त्यावेळी प्रियदर्शनी कोकरे यांनी तब्बल 80 सभा गाजवल्या होत्या, तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आटपाडी मतदार संघातही स्टार प्रचारक म्हणून सभा घेतल्या, तसेच सातारा लोकसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभेत देखील जोरदार भाषणे केली होती. त्यांनी 6 महिन्यांपासून बारामती लोकसभा मतदार संघातून दौरे सुरु केले आहेत. दौऱ्याला उत्स्फूर्त मिळत आहे.असे यावेळी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा.मोठी घोषणा..! तिरंगी लढतीचा फटका अजित पवारांना बारामतीत बसणार ? विजय शिवतारे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार
हेही वाचाइकडे राहुल गांधींची भारत जोडो महाराष्ट्रात ; तिकडे कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला
हेही वाचा…“तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार ;” नाशिकसाठी शांतिगिरी महाराजांनी शड्डू ठोकला
हेही वाचा..“सातारा आपलाच, कामाला लागा,” अजित पवारांनी लोकसभेसाठी कार्यकर्त्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
हेही वाचा…“मी कॉंग्रेसची, अन् कॉंग्रेसच्याच तिकीटावर निवडणुक लढणार”, चंद्रपुरात कॉंग्रेसमध्येच पेच वाढला