जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये खानदेशमधून जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी भाजप नेत्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलीय. यामुळे आता खानदेशात रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, तर जळगावमधून स्मिता वाघ या लोकसभेच्या महिला उमेदवार असणार आहेत. मात्र स्मृिता पाटील यांच्या उमेदवारीची अधिकच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरेंच्या ‘या’ विद्यमान खासदाराला भाजपकडून तिकीट
माजी विधान परिषद आमदार स्मिता वाघ यांना भाजपने २०१९ साली एबी फॉर्म दिला होता. मात्र ऐन वेळेस निवडणुक लढण्याची इच्छा नसतांनाही जळगाव लोकसभा मतदारसंघातून 2019 साली भाजपचे उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.मात्र तरीही स्मिता वाघ या पक्षावर नाराज झाल्या नाहीत. त्यांनी शांत संयमाने वागत पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी प्रामाणिकपणे काम केले आणि जळगावमधून भाजपचा खासदार निवडून आणला. यादरम्यान कुठेही पक्षाबद्दल अपशब्द न बोलता मान सन्मानाचीच भाषा त्यांनी वापरली. त्यांच फळ आता स्मिता वाघ यांना २०२४ च्या निवडणुकीत मिळालं असून भाजपने नाराजीही दुर केलीय.
हेही वाचा…पुणे लोकसभेसाठी मोहोळांवर शिक्कामोर्तब ; मुरलिधर मोहोळांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
स्मिता वाघ यांचा जळगाव मतदारसंघात बराच लोकसंपर्क राहिला आहे. त्यांचे पती उदय वाघ यांच्या निधनानंतर स्मिता वाघ यांनी स्वत:ला झोकून काम केले आहे. त्यामुळे स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. स्मिता वाघ यांच्या उमेदवारीवर मात्र उन्मेष पाटील यांनी नाराजी व्यक्त केली नाही. आता फक्त लीड मोजायचं असे म्हणत स्मिता वाघ यांना निवडून आणण्यासाठी सर्वोतरी प्रयत्न करणार असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा..“लंकेंनी चुकीची भूमिका घेतली तर, आमदारकी…” अजित पवारांचा लंकेंना गर्भित इशारा
हेही वाचा…“भाजपची गॅरंटी चायनीच मालासारखी ; चले तो चांद तक नहीं तो शाम तक”, जयंत पाटलांनी जोरदार टोलेबाजी
हेही वाचा.“तिकीट कापल्यानंतर जगदीश मुळीक यांची सोशल मीडियावर पोस्ट”, म्हणाले…
हेही वाचाविदर्भात भाजप धक्कातंत्राचा वापर करणार ; ‘या’ खासदारांचा पत्ता कट होणार ?