नवी दिल्ली : भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादित महाराष्ट्रातील चार खासदारांचे तिकीट कापले असून एकूण २० उमेदवारांची घोषणा केली आहे. तर संपुर्ण देशातील भाजपने एकूण ७२ जणांची घोषणा केली आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विद्यमान खासदारला भाजपकडून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…*“काल मनसेला जय महाराष्ट्र, आज वसंत मोरेंना ३ मोठ्या पक्षांची ऑफर”, कोणत्या पक्षात जाणार ?*
महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पंकजा मुंडे, मुरलिधर मोहोळ, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महाराष्ट्रातील विद्यमान खासदारांमध्ये जळगावमधू उन्मेष पाटील, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर पुर्व मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट केला आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटातील दादारा व नगर हवेलीचे खासदार कलाबेन डेलकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
हेही वाचा…“मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’” शिंदे अन् अजित पवारांना जोरदार टोला
कलाबेन डेलकर यांचे पती खासदार मोहन डेलकर यांचा २०२१ मध्ये मुंबईत संशयास्पत मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने महेश गावित यांना तिकीट दिले होते. परंतु शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत डेलकर यांना ५१,००० मतांनी विजय मिळाला होता. त्यामुळे भाजपने आता थेट त्यांना आपल्या पक्षातून उमेदवारी जाहीर केली आहे.
उमेदवारांची यादी
नागपूर – नितीन गडकरी
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार (सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पण पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे)
नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (चिखलीकर यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. पण अखेर त्यांनाच उमेदवारी मिळाली)
जालना – रावसाहेब दानवे
दिंडोरी – भारती पवार
भिंवडी – कपिल पाटील
उत्तर मुंबई – पियूष गोयल
मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा
पुणे – मुरलीधर मोहोळ
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – पंकजा मुंडे
लातूर – सुधाकर श्रृंगारे
माढा – रणजितसिंह निंबाळकर
सांगली – संजय काका पाटील
READ ALSO :
हेही वाचा…पुणे लोकसभेसाठी मोहोळांवर शिक्कामोर्तब ; मुरलिधर मोहोळांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…मुंडेंचं पुनर्वसन, मोहाळांना संधी, खडसेंवर विश्वास, तर मुनगंटीवारांना बळजबरी ; भाजपच्या २० उमेदवारांची यादी जाहीर
हेही वाचा..विजय शिवतारेंवरून शिंदेंना इशारा, परांजपेंना नरेश म्हस्केंनी सुनावलं
हेही वाचा…भाजपचा माजी खासदार शरद पवारांकडून निवडणूक लढणार; राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा..‘अहमदनगर’ शहराचं नाव बदललं, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय