नाशिक : महाविकास आघाडीतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे यांचा आज यवतमाळ-वाशिम दौरा होता. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी नाशकात पदाधिकाऱ्यांची संवाद साधला. यातच आता नाशिकची जागा ठाकरे गटाला तर दिंडोरीची जागा शरद पवार गटाला मिळणार असे स्पष्ट संकेत शरद पवारांनी आज नाशिक येथे दिले आहेत.
हेही वाचा…मोठी घोषणा..! तिरंगी लढतीचा फटका अजित पवारांना बारामतीत बसणार ? विजय शिवतारे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार
नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल असे शरद पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर ठाकरे गटाकडून विजय करंजकर अशी लढत होण्याची शक्यता आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवार यांच्याविरोधात माजी. जि. प. सदस्य भास्कर भगरे यांच्या नावाचा विचार सूरू आहे.
हेही वाचा…इकडे राहुल गांधींची भारत जोडो महाराष्ट्रात ; तिकडे कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवार यांनी २०१९ साली राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांच्याविरोधात निवडणुक जिंकली होती. माजी खासदार हरिचंद्र चव्हाण यांना डावलून भाजपने भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. तर आता हरिचंद्र चव्हाण राष्ट्रवादीकडून भारती पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा सुरू झालीय.
भारती पवार यांनी निवडणुकीच्या पुर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपचे माजी खासदार हरिचंद्र चव्हाण मागील काही वर्षांपासून नाराज आहेत. यातच आता हरिचंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवली तर याठिकाणी तगडी लढत होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा..‘अहमदनगर’ शहराचं नाव बदललं, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
हेही वाचा.*“काल मनसेला जय महाराष्ट्र, आज वसंत मोरेंना ३ मोठ्या पक्षांची ऑफर”, कोणत्या पक्षात जाणार ?*
हेही वाचा…“मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’” शिंदे अन् अजित पवारांना जोरदार टोला
हेही वाचा..“शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर विरोधकांना नक्कीच घाम फुटणार ?” कारण ही आलं समोर
हेही वाचा…“सुळे, सुनेत्रा पवार अन् शिवतारेंसह मैदानात, बारामतीच्या रिंगणात आणखी एक ओबीसी चेहरा उतरणार