नागपुर : राज्यात भाजपने चार विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं असून त्याठिकाणी नवीन उमेदवार घोषित केले आहे. एकूण २० उमेदवारांची घोषणा केली असून यामध्ये महाराष्ट्रातील विद्यमान खासदारांमध्ये जळगावमधू उन्मेष पाटील, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर पुर्व मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट केला आहे. तर आता विदर्भातील भाजपच्या काही खासदारांची धाकधुक वाढली आहे. विदर्भात देखील भाजप धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघापैकी चार मतदारसंघाची घोषणा केली आहे. तर इतर मतदारसंघात अजूनही उमेदवार ठरलेला नाहीय.
हेही वाचा..‘अहमदनगर’ शहराचं नाव बदललं, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
पुर्व विदर्भातील गडचिरोली मतदारसंघ गेल्यावेळी भाजपकडे होता. यावेळी देखील भाजप लढणार आहे. परंतु विद्यमान खासदार नाव पहिल्या यादीत नाही. त्यामुळे त्याठिकाणी देखील धक्कातंत्राचा वापर करणार का ? अशी शक्यात वर्तवण्यात येत आहे. यातच विद्यमान खासदार अशोक नेते सध्या उमेदवारीसाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून सुनील मेंढे खासदार होते. त्यांचाही पत्ता कट होणार असल्याची माहिती समोर आलीय. यातच भंडार-गोंदिया आणि गडचिरोली खासदारांचं नाव झालेल्या सर्व्हेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होतं. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…“काल मनसेला जय महाराष्ट्र, आज वसंत मोरेंना ३ मोठ्या पक्षांची ऑफर”, कोणत्या पक्षात जाणार ?
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री परिणय फुंके यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. तर गडचिरोली मधून मंत्री धर्माराव अत्राम यांना राष्ट्रवादीकडून घेऊन त्यांना कमळावर लढण्याची हालचाली भाजपच्या गोट्यातून दिसून येत आहे. तर अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना कमळाच्या चिन्हावरच लढावं लागणार असं भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे. उरलेल्या मतदारसंघात अजूनही रस्सिखेच सुरू झाली आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप काय रणनिती आखणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादित महाराष्ट्रातील चार खासदारांचे तिकीट कापले असून एकूण २० उमेदवारांची घोषणा केली आहे. तर संपुर्ण देशातील भाजपने एकूण ७२ जणांची घोषणा केली आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विद्यमान खासदारला भाजपकडून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
READ ALSO :
हेही वाचा.उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरेंच्या ‘या’ विद्यमान खासदाराला भाजपकडून तिकीट
हेही वाचा…पुणे लोकसभेसाठी मोहोळांवर शिक्कामोर्तब ; मुरलिधर मोहोळांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…मुंडेंचं पुनर्वसन, मोहाळांना संधी, खडसेंवर विश्वास, तर मुनगंटीवारांना बळजबरी ; भाजपच्या २० उमेदवारांची यादी जाहीर
हेही वाचा..विजय शिवतारेंवरून शिंदेंना इशारा, परांजपेंना नरेश म्हस्केंनी सुनावलं
हेही वाचा…भाजपचा माजी खासदार शरद पवारांकडून निवडणूक लढणार; राजकीय हालचालींना वेग