पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये पुणे लोकसभेतून माजी महापौर मुरलिधर मोहोळ यांच्यावर भाजपने शिक्कामोर्तब केला आहे. काही महिन्यांपासून पुणे लोकसभेचा उमेदवार कोण ? अशा जोरदार चर्चा सुरू होत्या. माजी आमदार जगदीश मुळीक आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात चांगलीच रस्सीखेच सुरू होती. मात्र अखेर भाजपने मोहोळ यांच्यावर विश्वास दाखवला आहे. यातच आता तिकीट कापल्यानतंर जगदीश मुळीक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे.
जनतेच्या सेवेत कायमच! कोणतेही पद नसतानाही माझ्या साठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यां,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद. आपलाच जगदीश मुळीक असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा…भाजपचा माजी खासदार शरद पवारांकडून निवडणूक लढणार; राजकीय हालचालींना वेग
दरम्यान, पक्षाने माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीची मी विनम्रपणे स्वीकारतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवू हा सार्थ विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याचा आमचा निर्धार आहे. या दृष्टीने गेल्या दहा वर्षात पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. ही विकासाची गंगा पुढे नेत पुणे शहराला जगाच्या नकाशावरील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख निर्माण करायची आहे. अशी प्रतिक्रिया मुरलिधर मोहोळ यांनी दिलीय.
हेही वाचा..‘अहमदनगर’ शहराचं नाव बदललं, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
पक्षाने माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीची मी विनम्रपणे स्वीकारतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवू हा सार्थ विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याचा आमचा निर्धार आहे. या दृष्टीने गेल्या दहा वर्षात पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. ही विकासाची गंगा पुढे नेत पुणे शहराला जगाच्या नकाशावरील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख निर्माण करायची आहे. असेही ते म्हणाले.
जनतेच्या सेवेत कायमच!
कोणतेही पद नसतानाही माझ्या साठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे.
जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे.
पुन्हा एकदा तमाम जनता आणि… pic.twitter.com/izbXGXEPoh
— Jagdish Mulik (Modi Ka Parivar) (@jagdishmulikbjp) March 14, 2024
READ ALSO :
हेही वाचाविदर्भात भाजप धक्कातंत्राचा वापर करणार ; ‘या’ खासदारांचा पत्ता कट होणार ?
हेही वाचा.उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरेंच्या ‘या’ विद्यमान खासदाराला भाजपकडून तिकीट
हेही वाचा…पुणे लोकसभेसाठी मोहोळांवर शिक्कामोर्तब ; मुरलिधर मोहोळांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…मुंडेंचं पुनर्वसन, मोहाळांना संधी, खडसेंवर विश्वास, तर मुनगंटीवारांना बळजबरी ; भाजपच्या २० उमेदवारांची यादी जाहीर
हेही वाचा..विजय शिवतारेंवरून शिंदेंना इशारा, परांजपेंना नरेश म्हस्केंनी सुनावलं