अहमदनगर : अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. निलेश लंके यांना दक्षिण नगरमधून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्याविरोधात लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून या चर्चांना अधिक उधाण आलंय. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंके यांनी गर्भित इशारा दिलाय.
हेही वाचा…पुणे लोकसभेसाठी मोहोळांवर शिक्कामोर्तब ; मुरलिधर मोहोळांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
अजित पवार गटात असलेले निलेश लंके हे पारनेरचे आमदार आहेत. त्यांनी याआधीही लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केलीय. यातच आता ते शरद पवार गटात दाखल होणार आहे. यावर आमदार निलेश लंके यांनी चुकीची भूमिका घेऊ नये आणि घेतलीच तर त्यांची आमदारकी जाणार असे अजित पवारांनी म्हटले आहे. निलेश लंके यांनी जर शरद पवारांची साथ द्यायचं ठरलं तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा व्हिप सर्वांना लागू आहे. त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेतली तर त्यांची आमदारकी जाणार असा इशाराच त्यांनी दिलाय.
हेही वाचा..विजय शिवतारेंवरून शिंदेंना इशारा, परांजपेंना नरेश म्हस्केंनी सुनावलं
दरम्यान, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिलीय. मात्र अद्यापही निलेश लंके यांनी पक्ष प्रवेशावर मौन धारण केले आहे. यातच आज त्यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे लंके आजच पक्ष प्रवेश करणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपची गॅरंटी चायनीच मालासारखी ; चले तो चांद तक नहीं तो शाम तक”, जयंत पाटलांनी जोरदार टोलेबाजी
हेही वाचा.“तिकीट कापल्यानंतर जगदीश मुळीक यांची सोशल मीडियावर पोस्ट”, म्हणाले…
हेही वाचाविदर्भात भाजप धक्कातंत्राचा वापर करणार ; ‘या’ खासदारांचा पत्ता कट होणार ?
हेही वाचा.उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरेंच्या ‘या’ विद्यमान खासदाराला भाजपकडून तिकीट