नाशिक : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. यातच राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ भाजपने ट्विट केला आहे. त्यात राहुल गांधी विठ्ठालाची मुर्तीचा अपमान केल्याचं भाजपने म्हटले आहे. परंतु भाजपने हा व्हिडीओ अर्धवट टाकल्याचं कॉंग्रेसकडून सांगण्यात आलं. त्यामुळे भाजपचा हा खोटरेपणा आता सगळीकडे व्हायरल होतांना दिसत आहे.
हेही वाचा..‘अहमदनगर’ शहराचं नाव बदललं, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
राहुल गांधी यांचा विठ्ठालाची मुर्तीसोबत एक व्हिडीओ भाजपने ट्विट केला आहे. त्यात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या पुण्यभूमीत येऊन विठू माऊलीचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. तसेच ६० वर्षापुर्वी तुमची आजी भाषणं ज्या प्रकारे ठोकत होती. त्याचप्रकारे तुम्हीही भाषण करत आहात. इतिहास साक्ष आहे की इंग्रजांप्रमाणे फोडा आणि राज्य करा हा कायम कॉंग्रेसचा अजेंडा राहिला आहे. यात राहुल गांधी याद राखा तुमचा हा खेळ महाराष्ट्रात रंगणार नाही. असा इशाराही भाजपने दिला.
यातच भाजपने अर्धवट टाकलेल्या व्हिडीओचा कॉंग्रेसकडून भांडोफोड करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला यावरून चांगलचं सुनावलं आहे. त्यात त्यांनी संत जनाबाई यांच्या अभंगाची ओळी टाकल्या आहेत. धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर || हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला आम्ही रामाचे पुजारी, हे तर रामाचे व्यापारी… ही संत जनाबाई ह्यांच्या अभंगाची ओळ या भाजपावाल्यांसाठी तंतोतंत लागू पडते. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“काल मनसेला जय महाराष्ट्र, आज वसंत मोरेंना ३ मोठ्या पक्षांची ऑफर”, कोणत्या पक्षात जाणार ?*
तसेच पक्ष तोडण्यापासून ते एखादा व्हिडिओ कसा तोडून-मोडून सादर करायचा, यातच भ्रष्ट भाजपा आणि त्यांचं ४० पैसे आयटी सेल धन्यता मानतं. राहुल गांधी यांनी विठोबाच्या मूर्तीसोबत जो मानसन्मान त्यांना मिळाला, तो सर्व स्वीकारला. पण त्यांचा हा व्हिडिओ भाजपने या ४० पैसे पेजने चुकीच्या पद्धतीने सादर केला गेला. तुम्ही तर राम मंदिर उभारूनसुद्धा देव बाटवला आहे. देवाचा व्यापार करणं हे काँग्रेसवाल्यांच्या रक्तात नाही. पण देवाच्या नावाने देशात राजकारण करणं, समाजात फुट पाडणं, हे भाजपावाल्यांच्या नसानसात आहे. त्यामुळे आतातरी ही संकुचित वृत्ती सोडा, नाहीतर ज्या दिवशी देव कोपला, तेव्हापासून तुमचा वाईट काळ सुरू झालाच समजा ! असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.
धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर ||
हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला
शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी
सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आलाआम्ही रामाचे पुजारी, हे तर रामाचे व्यापारी… ही संत जनाबाई ह्यांच्या अभंगाची ओळ या भाजपावाल्यांसाठी… https://t.co/2Y3P8E49Ag pic.twitter.com/DdBulBA14w
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 14, 2024
READ ALSO :
हेही वाचा..बारामतीप्रमाणेच ‘या’ ठिकाणीही होणार भावजय-विरूद्ध नणंद सामना, शरद पवारांनी घोषीत केला उमेदवार
हेही वाचा..वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पार पडणार पक्ष प्रवेश सोहळा ?
हेही वाचाकोर्टाने अजित पवारांना फटकारलं, आव्हाडांनी डिवचलं, म्हणाले, काका का हे आता चांगलचं…
हेही वाचा..शरद पवारांची नाशकात मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराला मैदानात उतरवणार
हेही वाचा…“मागच्या निवडणुकीत एबी फॉर्म भरला, पक्षाने तिकीट कापलं” मात्र 2024 साली स्मिता वाघांना निष्ठेचं फळ