नाशिक : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार म्हणजे नणंद विरूद्ध भावजय असा सामाना निश्चित झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला रावेर लोकसभा मतदारसंघातही नणंद विरूद्ध भावजय निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात लढण्याच्या तयारीत आहेत. काल भाजपने रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. तर दुसऱ्या बाजूला नाशिक येथील झालेल्या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“काल मनसेला जय महाराष्ट्र, आज वसंत मोरेंना ३ मोठ्या पक्षांची ऑफर”, कोणत्या पक्षात जाणार ?*
नाशिक येथे काल राष्ट्रवादी शरद पवार गटाची रावेर मतदारसंघाबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अॅड रविंद्र पाटील, आमदार एकनाथ खडसे, अॅड. रोहिणी खडसे, डॉ सतीष पाटील, गुलाबराव देवकर, महिला जिल्ह्याध्यक्षा वंदना चौधरी, वाल्मिक पाटील यांच्यासह माजी आमदार देखील उपस्थिती होते. या बैठकीत रोहिणी खडसे यांना रावेर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी असा ठराव देखील मंजूर झाल्याची माहिती रविंद्र पाटील यांनी दिलीय.
हेही वाचा…“मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’” शिंदे अन् अजित पवारांना जोरदार टोला
रावेर लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवारांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी आता रक्षा खडसे विरूद्ध रोहिणी खडसे असा सामाना होणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन, भाजपचे दोन, शिवसेना आणि एक अपक्ष आमदार या लोकसभा मतदारसंघात आहे. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत याठिकाणी भाजपचा खासदार निवडून आला आहे. त्यामुळे रोहिणी खडसे यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. असे सध्या तरी चित्र दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा..वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पार पडणार पक्ष प्रवेश सोहळा ?
हेही वाचाकोर्टाने अजित पवारांना फटकारलं, आव्हाडांनी डिवचलं, म्हणाले, काका का हे आता चांगलचं…
हेही वाचा..शरद पवारांची नाशकात मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराला मैदानात उतरवणार
हेही वाचा…“मागच्या निवडणुकीत एबी फॉर्म भरला, पक्षाने तिकीट कापलं” मात्र 2024 साली स्मिता वाघांना निष्ठेचं फळ
हेही वाचा..‘अहमदनगर’ शहराचं नाव बदललं, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय