नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक यासाठी केंद्र सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेतील समितीने एक देश एक निवडणुकबाबत अहवाल गुरूवारी राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांना सादर केला. पहिल्या टप्प्यात लोकसभा व विधानसभांच्या एकाचवेळी निवडणुका घ्याव्या. दुसऱ्या टप्पयात १०० दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी शिफारस यावेळी करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशात याची सध्या एकच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा….शरद पवारांची नाशकात मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराला मैदानात उतरवणार
रामनाथ कोविंद नेतृत्वातील समितीने राष्ट्पती द्रौपदी मुर्मू यांना याबाबत राष्ट्रपती भवनात अहवाल सादर केला. एकाचवेळी होणाऱ्या निवडणुकांमुळे विकास व सामाजिक एकसंधता वाढेल, लोकशाही पाया अधिक मजबुत होईल आणि इंडिया म्हणजे भारतचे स्वप्न साकार करण्यात मदत होईल असे समितीच्या १८००० हुन अधिक पानांच्या अहवालात म्हटले आहे. अहवाल सादर करतांना कोविंद यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन. के. सिंग. सुभाष कश्यप, गुलाम नबी आझाद आणि कायदामंत्री अर्जून राम मेघवाल यांच्यासह इतर समिती सदस्य होते.
हेही वाचा…“मागच्या निवडणुकीत एबी फॉर्म भरला, पक्षाने तिकीट कापलं” मात्र 2024 साली स्मिता वाघांना निष्ठेचं फळ
एक राष्ट्र, एक निवडणूक या उच्चस्तरीय समितीने ६२ पक्षांशी संपर्क साधला, ज्यापैकी ४७ पक्षांनी प्रतिसाद दिला. त्यातील ३२ पक्षांनी एकाच वेळी निवडणुका घेण्याचे समर्थन केले. तर १५ पक्षांनी विरोध केला. विधानसभेसाठी नव्याने निवडणुका घेतल्या जातील व विधानसभा लवकर विसर्जित केल्या नसतील तर लोकसभेच्या कार्यकाळ समाप्तीपर्यंत त्या चालू राहतील असेही सांगण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुकीपुर्वीच महायुतीत खळबळ, उमेदवारीसाठी महायुतीत ‘हा’ खासदार बंडाच्या तयारीत
हेही वाचा…कॉंग्रेसकडून भाजपचा भांडाफोड, राहुल गांधींचा ‘तो’ व्हिडीओ भाजपच्या अंगलट, चांगलचं सुनावलं
हेही वाचा..बारामतीप्रमाणेच ‘या’ ठिकाणीही होणार भावजय-विरूद्ध नणंद सामना, शरद पवारांनी घोषीत केला उमेदवार
हेही वाचा..वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पार पडणार पक्ष प्रवेश सोहळा ?
हेही वाचाकोर्टाने अजित पवारांना फटकारलं, आव्हाडांनी डिवचलं, म्हणाले, काका का हे आता चांगलचं…