पुणे : माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर मनसेत अनेकांनी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरू असतांना आता महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केलीय. काल शरद पवारांची वसंत मोरे यांनी भेट घेतल्यानंतर आज सामानाच्या कार्यालयात विद्यमान खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. तसेच पुण्यात वॉशिंग मशिन नकोच म्हणत पुणे लोकसभेची निवडणुक लढवणारच यावर मोरे ठाम राहिले आहेत.
हेही वाचा..“लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील,” एक देश एक निवडणुकीबाबत राष्ट्रपतीकडे अहवाल सादर, राजकीय हालचाली वाढल्या
आपण सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहोत. पण या सगळ्या भेटीगाठी मी उघडपणे घेत आहोत. बंद दरवाजे ठेवून मी कोणत्याही भेटीगाठी घेत नाही, पुणे लोकसभा निवडणुक लढवायची आहे. यावर ठाम असून त्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेत असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले आहे. संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटी घेतल्या असून त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही मोरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील,” एक देश एक निवडणुकीबाबत राष्ट्रपतीकडे अहवाल सादर, राजकीय हालचाली वाढल्या
दरम्यान, पुण्याची जागा कॉंग्रेसकडे असली तरी त्या ठिकाणची नेत्यांशी माझा समन्वय आहे. त्यांचा मी संपर्कात आहे. आमदार रविंद्र धंगेकरांशी फोन केला असून त्यांना अजून फोन करायचा आहे. ते देखील माझ्या भूमिकेला साथ देतील, असा विश्वास व्यक्त करत मोरेंनी कॉंग्रेसचे अरविंद शिंदे देखील इच्छूक असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“शिंदे गटात राजकीय भुकंप, शिंदेंचे १२ आमदार पुन्हा ठाकरेकडे जाणार “?
हेही वाचा…तर पुणे लोकसभेची लढत तगडी होणार ; कॉंग्रेसकडून बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीचा उद्या बिगूल वाजणार, महाराष्ट्राकडे विशेष लक्ष
हेही वाचा…मोठी बातमी..! 2024 च्या लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा होणार, हालचाली वाढल्या
हेही वाचा.ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल