चंद्रपुर : राज्यात लोकसभा निवडणुकांचा उद्यापासून बिगूल वाजणार आहे. त्याआधी राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. तर उमेदवारांची घोषणा येत्या दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता आहे. यातच शिंदे गटातील १२ आमदार ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा वकिल असीम सरोदे यांनी केला आहे. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
हेही वाचा…“लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील,” एक देश एक निवडणुकीबाबत राष्ट्रपतीकडे अहवाल सादर, राजकीय हालचाली वाढल्या
चंद्रपुर येथील एका कार्यक्रमात असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. यातच थेट सरोदे यांनी शिंदे गटातून ठाकरे गटात जाणाऱ्या आमदारांची यादी वाचून दाखवली आहे. तर सरोदे यांनी वाचून दाखवलेल्या यादीतील दोन आमदार आधीच ठाकरे गटात आहे. त्यामुळे सरोदे यांच्या दाव्यावर शंका देखील उपस्थित केली जात आहे. तरीही देखील दुसऱ्या बाजूला शिंदे गटात मोठा राजकीय भुकंप होईल, अशी भीतीही आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
हेही वाचा…निवडणुकीपुर्वीच महायुतीत खळबळ, उमेदवारीसाठी महायुतीत ‘हा’ खासदार बंडाच्या तयारीत
असीम सरोदे यांनी शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची यादी वाचून दाखवली आहे. यामध्ये पालघरचे श्रीनिवास वणगा, चोपडा मतदारसंघाच्या लता सोनावणे, अलिबागचे महेंद्र दळवी, मागठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर, एरंडोलचे चिंतामणराव पाटील, बालापुरचे नितीन कुमार तळे, औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे प्रदीप जयस्वाल, छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे उदयसिंह राजपूत, साताऱ्यातील कोरेगावचे महेश शिंदे आणि राधानगरीचे प्रकाश आंबीटकर यांनाही शिंदे गटाकडून पुन्हा ठाकरे गटाकडे जायचे आहे. असे सरोदे यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…तर पुणे लोकसभेची लढत तगडी होणार ; कॉंग्रेसकडून बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीचा उद्या बिगूल वाजणार, महाराष्ट्राकडे विशेष लक्ष
हेही वाचा…मोठी बातमी..! 2024 च्या लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा होणार, हालचाली वाढल्या
हेही वाचा.ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा..“लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील,” एक देश एक निवडणुकीबाबत राष्ट्रपतीकडे अहवाल सादर, राजकीय हालचाली वाढल्या