मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. देशातील राजकीय पक्षांना इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी फंड दिला आहे. त्याची माहिती एसबीआय बॅकने उघड करावी असे आदेशच सर्वोच्च न्यायालयने दिले आहेत. यामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रोल बॉन्ड हे भाजपला मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे. यावरूनच आता राज्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने भाजपवर जोरदार टिका करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! 2024 च्या लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा होणार, हालचाली वाढल्या
इलेक्ट्रोल बॉन्डचा स्कॅम म्हणत विरोधकांनी भाजपवर जोरदार टिका करण्यास सुरूवात केली आहे. यातच राष्ट्रवादीनेही नरेंद्र मोदी यांचा जुना व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे. यामध्ये पुलवामा हल्ला झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच पाकिस्तानी कंपनीने भाजपला निधी देण्यासाठी SBI कडून इलेक्ट्रोल बॉन्ड घेतले होते. परंतु देशभक्तीवर बोलणाऱ्या भाजपने इलेक्ट्रोल बॉन्ड देण्यापासून SBI ला का रोखले नाही ? जवानांच्या बलिदानापेक्षाही भाजपला इलेक्ट्रोल बॉन्ड महत्वाचे का वाटले ? असा सवाल शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा….ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल
शरद पवार गटाकडून व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. त्यावर भाजपने थेट शरद पवार गटाला धमकीच दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जनतेशी दिशाभूल करणारी पोस्ट डिलिट करून माफी मागावी, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे भाजपने म्हटले आहे. दरम्यान, भाजपने कोण कोणाकडून इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून पैसे जमा केले आहेत. याची सगळी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकीपुर्वी भाजपला याचा मोठा फटका बसला आहे. तर भाजपकडूनही आता वेगवेगळ्या बळाचा वापर केला जात असल्याचं दिसून येत आहे.
देशाचे सन्मानीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल जनतेची दिशाभूल करणारी सदर पोस्ट डिलिट करून माफी मागावी, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.@NCPspeaks https://t.co/UaIMl5YzAA
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 15, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“रोहिणी खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून लढणार नाही”, एकनाथ खडसे काय काय म्हणाले ?
हेही वाचा..“पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नकोच ; माझंही तेच मत ,” शरद पवारानंतर राऊतांची मोरेंनी घेतली भेट
हेही वाचा..“शिंदे गटात राजकीय भुकंप, शिंदेंचे १२ आमदार पुन्हा ठाकरेकडे जाणार “?
हेही वाचा…तर पुणे लोकसभेची लढत तगडी होणार ; कॉंग्रेसकडून बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीचा उद्या बिगूल वाजणार, महाराष्ट्राकडे विशेष लक्ष