पुणे : भाजपने पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्यापही कोणत्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. यातच पुणे मतदारसंघ हा कॉंग्रेसला मिळणार असून याठिकाणी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला मनसेला सोडचिठ्ठी देणारे वसंत मोरे देखील निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. यावर आता रवींद्र धंगेकर यांनी मोठा इशारा दिलाय.
हेही वाचा..“शिंदे गटात राजकीय भुकंप, शिंदेंचे १२ आमदार पुन्हा ठाकरेकडे जाणार “?
वंसत मोरे कॉंग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. भाजपने मित्रपक्षाचा विचार न करता उमेदवारी घोषित केली आहे. परंतु कॉंग्रेस मित्रपक्षांचा विचार करून निर्णय घेते. सगळ्यांना विचारात घेऊन कॉंग्रेस निर्णय घेणार आहे. मी कॉंग्रेसचा उमेदवार नाही. उद्याप पक्षाने तसं जाहीर केले नाही. माझ्यासह २० जणांनी उमेदवारी मागितली आहे. कॉंग्रेस पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी मी उभा राहयला तयार आहे. कारण मी कार्यकर्ता आहे असेही धंगेकरांनी सांगितले.
हेही वाचा…तर पुणे लोकसभेची लढत तगडी होणार ; कॉंग्रेसकडून बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात
वसंत मोरे पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. आता उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय पक्ष घेत असतो. पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांची गरज आहे. तसा पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यामागे मी उभा राहणार आहे. मी मित्रासाठी नाही तर कॉंग्रेस पक्षासाठी माघार घ्यायला तयार आहे. तसेच पुण्यात मोदींचे मोहोळ आलेत. अजून पुणेकरांचे मोहोळ उठले नाही. ते ज्यादिवशी उठेल तेव्हा भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना रणांगणातून पळून जावे लागेल. जनता लाट आहे. फक्त उमेदवारी जाहीर होऊ द्या. मग पुणेकरांचे मोहोळ उठेल ते बघा असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा..कॉंग्रेसच्या उमेदवारांची आज घोषणा तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी
हेही वाचाते तर… ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, शिवसेना शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे जाणार नाहीत
हेही वाचा…“मोदींची ‘ती’ पोस्ट डिलीट करा अन्यथा…”, भाजपने शरद पवार गटाला दिली धमकी
हेही वाचा…“रोहिणी खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून लढणार नाही”, एकनाथ खडसे काय काय म्हणाले ?
हेही वाचा..“पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नकोच ; माझंही तेच मत ,” शरद पवारानंतर राऊतांची मोरेंनी घेतली भेट