छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काही जागांवर भाजपने विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान खासदारांवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आता उरर्वित महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
हेही वाचा…तर पुणे लोकसभेची लढत तगडी होणार ; कॉंग्रेसकडून बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात
लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने महाराष्ट्रात २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची यादी रविवारी किंवा सोमवारी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिलीय. यामध्ये ज्या दोन ते तीन जागांवरून तिढा आहे. तो सुटणार असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिलीय.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीचा उद्या बिगूल वाजणार, महाराष्ट्राकडे विशेष लक्ष
तर दुसऱ्या बाजूला आता भाजपनंतर कॉंग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करणार आहे. कॉंग्रेस थोड्याच वेळात आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेतून उमेदवारी जाहीर करणार आहे. आता कॉंग्रेसच्या या पहिल्या यादीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचाते तर… ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, शिवसेना शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे जाणार नाहीत
हेही वाचा…“मोदींची ‘ती’ पोस्ट डिलीट करा अन्यथा…”, भाजपने शरद पवार गटाला दिली धमकी
हेही वाचा…“रोहिणी खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून लढणार नाही”, एकनाथ खडसे काय काय म्हणाले ?
हेही वाचा..“पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नकोच ; माझंही तेच मत ,” शरद पवारानंतर राऊतांची मोरेंनी घेतली भेट
हेही वाचा..“शिंदे गटात राजकीय भुकंप, शिंदेंचे १२ आमदार पुन्हा ठाकरेकडे जाणार “?