मुंबई : छत्रपती संभाजीनगरमधून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या जागी आता माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने दानवे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अंबादास दानवे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अंबादास दानवे शिंदे गटात गेले तर ठाकरेंना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
आमच्यात वाद नाही, मतभेद नाहीत असे सांगत ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल, त्याचा एकदिलाने प्रचार करून असे सांगणारे अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळतेय असे समजल्यावर नाराज झाले आहेत. या नाराजीतून दानवे हे एक दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“फक्त उमेदवारी जाहीर होऊ द्या, मग पुणेकरांचे मोहोळ उठेल”, धंगेकरांनी मोहोळांना दिला इशारा
मागच्या दहा वर्षापासून लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहे. निवडणुक लढण्याची इच्छा लपवून ठेवलेली नाही. पक्ष प्रमुखांना देखील याची माहिती दिली आहे. अजूनही कोणताही चेहरा दिलेला नाही. उमेदवार देण्यासाठी अजूनही बराच कालावधी बाकी आहे. त्यामुळे जुना किंवा नवा चेहरा द्यायचा हे उद्धव ठाकरे साहेब ठरवणार आहे. असेही म्हणत मी कुठेही जाणार नाही. असेही अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
एकाधिकारशाहीने कुणी वागत असेल तर त्याची दखल पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे. चंद्रकांत खैरे आजच नाही तर नेहमीच मला डावलण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच मी खैरेंसाठी काम करत नसून उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करत आहे. त्यामुळे ते काय म्हणतात त्याला माझी काही देणघेण नाही. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा….कॉंग्रेसच्या उमेदवारांची आज घोषणा तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी
अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. काल सायंकाळी उद्धव ठाकरे, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, संजय राऊत आमच्यात छत्रपती संभाजीनगर उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा झाली. उमेदवारीबाबत एकमत झालं. त्यात दानवे देखील समावेश होते. अंबादास दानवे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचाराज्यात आणखी काका-पुण्याचा संघर्ष, “महादेव जानकरांविरोधात पुतण्यानेच दंड थोपडले”
हेही वाचा….“भाजपच्या मिशन ४५ ला मराठा समाज सुरूंग लावणार,” जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा..साताऱ्यातून उदयनराजेंचा पत्ता कट होणार का ? चर्चांना उधाण, तर कार्यकर्ते आक्रमक
हेही वाचा…महायुतीतच तणावाचे १० लोकसभा मतदारसंघ ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, दिल्लीत होणार अंतिम निर्णय
हेही वाचा…संभाजीनगरमध्ये खैरे-दानवे संघर्ष पेटणार ; लोकसभा उमेदवारीवरून अंबादास दानवे नाराज