पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर पवार कुटुंबात मोठी फुट पडली. मात्र विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्याने आता पवार घराण्यातून अजित पवारांवर जोरदार टिका करण्यास सुरूवात झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी संपुर्ण पवार कुटुंबिय मैदानात उतरले आहे. अशातच अजित पवार यांचे सखे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर सडकून टिका केली आहे. यावेळी श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांचा थेट नालायक माणूस म्हणून उल्लेख केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा…“तिकीट कापलं, तरीही पक्षावर निष्ठा कायम, मुळीकांची मोहोळांनी घेतली गळाभेट”
अजिदादांच्या विरोधात कसा काय आलो याचं आश्चर्य वाटलं असेल. दादांच्या चांगल्या आणि वाईट काळात मी त्यांच्यासोबत होतो. त्यांनी जे निर्णय घेतले त्याला मी साथ दिली. भाऊ म्हणून त्यांनी सांगितलं तिथे उडी मारली. कधी काही विचारलं नाही, पण आमची जेव्हा चर्चा जाली तेव्हा माझं म्हणणं होतं की आमदारकी तु आहेत तर खासदारकी साहेबांकडे दिली पाहिजे. कारण साहेबांचे आमच्यावर उपकार आहेत. साहेबांचं वय आत ८३ झाल्यामुळे या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. वयस्कर झालेल्या माणसाची आपण किमंत करत नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला. कारण पुढची १० वर्षे दुसऱ्या व्यक्तीकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा नालायक माणूस नाही असे म्हणत श्रीनिवास पाटील यांनी अजित पवारांना चांगलचं सुनावलं.
हेही वाचा…“मोदींची गॅरंटी संविधानाला धोका, निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी काही राजकारणी नाही मला जेत पटत नाही ते मी करत नाही. माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले. आपण औषधे घेतो त्याची एक्सपायरी डेट असते तशी काही नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. आता माझं वय ६० आहे. मला दाबून जगायचं नाही. जगायचं तर ताट मानेने व स्वाभिमानाने जगायचे आहे. केवळ कुणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्याच्या पाठीमागे जायचे बरोबर नाही. मला नाही वाटत त्यांना सुध्दा झोप येत असेल.असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.
READ ALSO :
लोकसभेसाठी शरद पवारांचे ‘१०’ शिलेदार ठरले ; भाजपसह अजित पवारांनाही देणार मोठी टक्कर
हेही वाचा…कोल्हापुरची जागा शाहू महाराजांसाठी तर सांगलीतून चंद्रहार पाटील, मविआचं जागावाटपाचं ठरलं
हेही वाचा…शिरूर लोकसभाबाबत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेना, आढळरावांची मुख्यमंत्र्यांकडून चर्चेवर बोळवण
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंच्या विरोधात भाजप बंडाच्या पावित्र्यात..”, मावळात महायुतीत मिठाचा खडा ?
हेही वाचा…“आजोबाला अर्धांगवायू, वय वर्षे ६२, पेशाने रिक्षाचालक, येणार तर मोदीच “, भाजप नेत्याचा अनुभव