सोलापूर : महायुतीकडून माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने आता धैर्यशील मोहित पाटील नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काल दुपारी अकलुज येथील मोहित पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर नेत्यांची बैठकही झाली. या बैठकीत अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेचे माजी जिल्ह्याध्यक्ष संजय कोकाटे उपस्थित होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली. माढ्यात बंड पुकारण्याच्या आधीच भाजपने मंत्री गिरीश महाजन यांना पाचरण केले. त्यामुळे याची एकच चर्चा सुरू झाली.
हेही वाचा…“आजोबाला अर्धांगवायू, वय वर्षे ६२, पेशाने रिक्षाचालक, येणार तर मोदीच “, भाजप नेत्याचा अनुभव
माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र भाजपने पुन्हा रणजित सिंह निंबाळकर पाटील यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले असल्याची माहिती आहे. यातच काल अनेक नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या घरी एकत्र आल्याने याची एकच चर्चा सुरू झाली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, अर्जूनसिंह मोहिते पाटील शिवतेज सिंह मोहिते पाटील, आदीही उपस्थित होते.
हेही वाचा…“तिकीट कापलं, तरीही पक्षावर निष्ठा कायम, मुळीकांची मोहोळांनी घेतली गळाभेट”
दरम्यान, महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेची जागा ही शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात येऊन निवडणुक लढवणार का ? अशीही चर्चा सुरू झाली. काल झालेल्या बैठकीत उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काही नेत्यांनी मोहिते पाटलांनी शरद पवार यांच्या पक्षातून उमेदवारी घ्यावी अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, दुपारी रामराजे निंबाळकर आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची बैठक मोहिते पाटलांच्या बंगल्यावर पार पडली. त्यानंतर बंडखोरी टाळल्यानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन तातडीने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अकलुजला दाखल झाले. यावेळी मोहिते पाटलांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणा देत माढ्याचे उमेदवार बदलण्याचीही मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
READ ALSO :
हेही वाचा…“याच्यासारखा नालायक माणूस नाही”, सख्या भावाने अजित पवारांना खडसावलं
लोकसभेसाठी शरद पवारांचे ‘१०’ शिलेदार ठरले ; भाजपसह अजित पवारांनाही देणार मोठी टक्कर
हेही वाचा…कोल्हापुरची जागा शाहू महाराजांसाठी तर सांगलीतून चंद्रहार पाटील, मविआचं जागावाटपाचं ठरलं
हेही वाचा…शिरूर लोकसभाबाबत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेना, आढळरावांची मुख्यमंत्र्यांकडून चर्चेवर बोळवण
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंच्या विरोधात भाजप बंडाच्या पावित्र्यात..”, मावळात महायुतीत मिठाचा खडा ?