नवी दिल्ली : राज्यातील महायुतीत सामील होऊन लोकसभा निवडणुक लढण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे सोमवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. चार दिवसात ते दुसऱ्यांदा दिल्लीत आले आहे. त्यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
हेही वाचा…“याच्यासारखा नालायक माणूस नाही”, सख्या भावाने अजित पवारांना खडसावलं
राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे देखील रात्री साडेनऊच्या दरम्यान आपल्या काही सहकाऱ्यांसोबत दिल्लीत दाखल झाले आहेत. ते अमित शाह यांच्या निवासस्थानापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉटेल ताज मानसिंह येथे थांबले आहेत. यासंदर्भात काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला असता. माझ्याकडे आत्ता बोलण्यासारखे काही नाही. मला काही माहिती नाही, फक्त या असे सांगितले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…लोकसभेसाठी शरद पवारांचे ‘१०’ शिलेदार ठरले ; भाजपसह अजित पवारांनाही देणार मोठी टक्कर
दरम्यान, राज ठाकरे आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांच्यात होणाऱ्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी, दिल्ली येथील भाजप मुख्यालयात शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची महाराष्ट्र भाजप कोअर समितीचे सदस्य फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक झाली.
राज्यातील उरलेल्या २८ जागांचे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये कसे वाटप करायचे यावर त्यांची चर्चा झाली. मंगळवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून त्यात राज्यातील भाजप उमेदवारांची नावे निश्चित होणार आहे.
मनसे सहभागी झाल्यास महायुतीला बळ मिळेल, दक्षिण मुंबईसह मनसेला आणखी कोणते मतदारसंघ दिले जातात. याची उत्सुकता असून मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नाशिक, पुणे या मतदारसंघात मनसेची महायुतीला मदत होऊ शकते.
READ ALSO :
हेही वाचारक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून भाजपात बंड, असंख्य कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
हेही वाचा“सख्खा भावाने अजित दादांना खडसावलं ; अजित पवार गटाकडून दिलं जोरदार प्रत्युत्तर”
हेही वाचा…सांगलीच्या जागेवरून ठाकरे अन् कॉंग्रेसमध्ये मोठी लढाई ; महाविकास आघाडीचे नेते आमनेसामने
हेही वाचा…जागा वाटपात ठाकरे मोठा भाऊ, २२-१६-१० लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला
हेही वाचा…माढ्यात महायुतीचे नेते आपल्याच उमेदवाराचा गेम करणार, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून महाजनाला पाचरण