पुणे : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे, मात्र महायुतीतच अजूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाहीय. यातच शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतांना महायुतीतील आरपीआय रामदास आठवले गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिर्डी लोकसभा स्वत: ला तर सोलापुर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासाठी सोडण्याची मागणी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे केलीय. मात्र भाजपने एकही जागा न सोडण्याची भूमिका घेतल्याने आरपीयआयच्या नेत्यांनी भाजपसह महायुतीला कडक इशारा दिलाय.
हेही वाचा…माढ्यात महायुतीचे नेते आपल्याच उमेदवाराचा गेम करणार, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून महाजनाला पाचरण
2009 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले यांना पराभावाचा सामाना करावा लागला होता. त्यामुळे भाजप शिर्डी लोकसभेची जागा आरपीआयला देऊन पराभावाचा धोका पत्करणार नाही.
दुसऱ्या बाजूला सोलापुरमधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार राम सातपुते यांना कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उतरविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर भाजपने आपले उमेदवार फिक्स केले आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर भाजपकडून अद्याप तरी पुर्णविराम देण्यात आला आहे.
हेही वाचा…“याच्यासारखा नालायक माणूस नाही”, सख्या भावाने अजित पवारांना खडसावलं
यातच राज्यसभेचे माजी सदस्य अमर साबळे या पिंपरी चिंचवडमधूनही आपले नाव मागे पडले आहे.दोन्ही जागा न मिळण्याचे संकेत मिळत असल्याने पिपंरी चिंचवडचे दोन माजी अध्यक्ष भाजपच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदासंघात काम करणार नसल्याचा इशारा माजी अध्यक्ष स्वपीन कांबळे यांनी दिला आहे.
तर रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघ सोडला नाही तर मावळ आणि शिरूरमध्ये नोटाला मतदान करू असा इशारा दुसरे माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीत सामील झाल्यास मनसेला मिळणार दक्षिण मुंबई, तर महायुतीला ‘या’ ठिकाणी होणार मनसेचा फायदा
हेही वाचारक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून भाजपात बंड, असंख्य कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
हेही वाचा“सख्खा भावाने अजित दादांना खडसावलं ; अजित पवार गटाकडून दिलं जोरदार प्रत्युत्तर”
हेही वाचा…सांगलीच्या जागेवरून ठाकरे अन् कॉंग्रेसमध्ये मोठी लढाई ; महाविकास आघाडीचे नेते आमनेसामने
हेही वाचा…जागा वाटपात ठाकरे मोठा भाऊ, २२-१६-१० लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला