मुंबई : महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत बैठक गुरूवारी मुंबईत होत असतानाच १८ जागा लढवण्यावर कॉंग्रेसने दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय घेतला असून त्यातील काही नावेही बाहेर आली आहेत. गुरूवारी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक होत असून यावेळी पवार यांच्यासह कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा…“भाजपची बंदुक अजितदादांच्या खांद्यावरून..,” रोहित पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा समाचार
यातच लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना पुण्यातून, गडचिरोली-चिमुर नामदेव किरसान, चंद्रपुर विजय वडेट्टीवार, नागपुर विकास ठाकरे, रामटेक रश्मी बर्वे, अमरावती बळवंत वानखेडे, अकोला प्रकाश आंबेडकर अथवा अभय पाटील, कोल्हापुर छत्रपती शाहू महाराज, सोलापुर प्रणिती शिंदे, नांदेड वसंत चव्हाण, लातूर शिवाजी काळगे, नंदुरबार गोवाल पाडवी, भंडारा-गोंदिया नाना पटोले, भिवंडी दयानंद चोरगे, आणि सांगलीतून विशाल पाटील यांची नावे समोर आली आहेत.
हेही वाचा…मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? ‘या’ माजी खासदार हाती भगवा घेणार ?
दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांना बोलावण्यात येणार आहे की नाही, याबाबत अनिश्चितता आहे, ते सोबत आले नाहीत तर कोणाला उमेदवारी द्यायची, याबद्दलही कॉंग्रेसने चर्चा केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अखेर माढा लोकसभा मतदासंघाचा तिढा सुटला ; रामराजे नाईक निंबाळकर यांचं एक पाऊल मागे
हेही वाचा…‘त्या’ ७ जागांवर कॉंग्रेसला मदत करायला तयार ; प्रकाश आंबेडकरांचं कॉंग्रेसला पत्र
हेही वाचा…मनसेला महायुतीत किती जागा ? अमित ठाकरे लोकसभा लढवणार का ? भाजपला मनसेचा फायदा कुठे ?
हेही वाचा…“प्रणिती शिंदेंना फोडण्याचा भाजपचा शेवटपर्यंत प्रयत्न, पण…,” सुशील कुमार शिंदेंचा मोठा दावा
हेही वाचा…“तर मला पहिल्या क्रमांकाची मतं मिळणार”, पुणे लोकसभेबाबत वसंत मोरे यांचा मोठा दावा