पुणे : लोकसभेसाठी उमेदवार म्हणून कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. कॉंग्रेसच्या निवडणूक कमिटीने दिल्लीत झालेल्या बैठकीत धंगेकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. भाजपकडून महायुतीचे भाजपचे उमेदवार म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे धंगेकर विरूद्ध मोहोळ असा पुणे लोकसभेचा सामाना रंगण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“तर मला पहिल्या क्रमांकाची मतं मिळणार”, पुणे लोकसभेबाबत वसंत मोरे यांचा मोठा दावा
मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत सीईसीची दिल्लीत बैठक झाली. तत्पुर्वी सीईसीच्या सदस्यांनी पक्षाकडून या मतदारसंघात इच्छूक असलेले प्रदेश उपाध्य मोहन जोशी यांच्याकडे विचारणा केली असल्याचे समजत आहे. मोहोळ यांच्याविरोधात धंगेकर यांना उमेदवारी दिली तर लढत कशी होईल, अशी विचारणा त्यांच्याकडे केली असल्याचे समजत आहे.
हेही वाचा…“भाजपची बंदुक अजितदादांच्या खांद्यावरून..,” रोहित पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा समाचार
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढवली होती. सलग २८ वर्षे भाजपकडे असलेला हा मतदारसंघ त्यांनी कॉंग्रेसकडे खेचून आणला होता. महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी त्यावेळी एकत्रित काम करत भाजपला मदत दिली होती. तीच जादू परत दिसावी अशी कॉंग्रेसची अपेक्षा आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेस लोकसभेच्या १८ जागा लढविणार ; महायुतीसमोर तगडे आव्हान, उमेदवारांची यादी जाहीर ?
हेही वाचा…अखेर माढा लोकसभा मतदासंघाचा तिढा सुटला ; रामराजे नाईक निंबाळकर यांचं एक पाऊल मागे
हेही वाचा…‘त्या’ ७ जागांवर कॉंग्रेसला मदत करायला तयार ; प्रकाश आंबेडकरांचं कॉंग्रेसला पत्र
हेही वाचा…मनसेला महायुतीत किती जागा ? अमित ठाकरे लोकसभा लढवणार का ? भाजपला मनसेचा फायदा कुठे ?
हेही वाचा…“प्रणिती शिंदेंना फोडण्याचा भाजपचा शेवटपर्यंत प्रयत्न, पण…,” सुशील कुमार शिंदेंचा मोठा दावा