पुणे : मी लोकसभा लढणारच, पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही, मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते. असा पवित्रा आता मनसे सोडून मैदानात उतरलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी घेतला आहे. पुणे लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा वसंत मोरे यांनी बोलून दाखवली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी आता भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
हेही वाचा…अजित पवार गटातील ‘विलास लांडे’ अपक्ष लढणार, शिरूरमध्ये तिरंगी लढत अटळ ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळावं यासाठी मोरे यांनी कॉंग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाशीही संपर्क साधलाय. मात्र कुणाकडूनही सकारात्म प्रतिसाद न आल्याने वसंत मोरे एकला चलो रे च्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. कुठल्याही पक्षात जाण्यासाठी मी मनसेतून बाहेर पडलो नाही, मी लोकसभा निवडणुक लढविण्यावर १०० टक्के ठाम आहे. जोपर्यंत वसंत मोरे पुणे शहाराध्ये आहे, तोपर्यंत ही निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही. असे वसंत मोरे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…कसब्याची जादू पुण्यातही दिसणार ; पुण्यातून कॉंग्रेसचे धंगेकर लोकसभेसाठी निश्चित
दरम्यान, पुणे लोकसभेसाठी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर वसंत मोरे यांनी देखील अपक्ष निवडणुक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ही निवडणुक तिरंगी होणार असे आता जवळपास निश्चित झालं आहे.
READ ALSO :
हेही वाचा..पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंची ताकद मिळणार ; बीडचं मैदान महायुतीच मारणार ?
हेही वाचा…“पैलवान कधीच म्हातारा होत नसतो”, शरद पवारांचा उल्लेख करत ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…रणजित सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीवर भाजप ठाम ; नाराजींची नाराजी भाजप दुर कशी करणार ?
हेही वाचा…मनसेच्या महायुतीतील सहभागाची आजच घोषणा ; राज ठाकरेंना किती जागा? हालचालींना वेग
हेही वाचा…रामटेक अन् नागपुरमध्ये पहिल्याच दिवशी ११३ अर्जांची विक्री, ४०० पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात