पुणे : महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. पुण्यातील रेसकोर्स येथील मैदानावर होत असलेल्या सभेसाठी बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीकडून या सभेची जय्यत तयारी करण्यात आलीय. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी खास दिग्विजय पगडी मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून मुरूडकर झेंडेवाले यांनी साकारली आहे. पाहताक्षणी डोळ्यात भरणारी ही पगडी पारंपारिक पुरातन पद्धतीने तयार केलीय.
हेही वाचा…“भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले, भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच”
पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात आजवर विविध पगडी घालून स्वागत करण्यात आले असून यंदाची पगडीही चर्चेचा विषय ठरली आहे. याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले की, ‘ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणाऱ्या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजवलेल्या या विशेष पगडीच्या शीर्षस्थानी साक्षात तुळजाभवानीची प्रतिमा आहे. दिग्विजयाला साजेशा सात घोड्यांच्या मंचकाची संकल्पना यातून प्रतीत होते. त्यामुळे तिला दिग्विजय योद्धा पगडी नाव दिले गेले आहे’.
हेही वाचा…“नरेंद्र मोदींमुळे २०१४ नंतर देशाने गतिमान प्रगती केली” , आढळराव पाटलांचं मोठं विधान
मोहोळ पुढे म्हणाले, ‘मोदीजींचे आजवर अनेक पुणे दौरे झाले, त्यात त्यांचे विविध पगड्या घालून स्वागत केले आहे. पण आजची पगडी निश्चितच विशेष आहे. दिग्विजयाची साक्ष देणारी ही पगडी आपल्या मराठी परंपरेचा बाज आणि शौर्य दर्शविणारी आहे’
छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळा देऊन होणार स्वागत !
पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी खास पगडी साकारल्यानंतर त्यांचे स्वागतही जोरदार केले जाणार आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा आणि तलवार भेट देऊन मोदींचे स्वागत करणार असल्याचेही मोहोळ यांनी यावेळी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“कोरोना संकटातच कोल्हेंची राजीनाम्याची तयारी !”अजित पवारांचा गौप्यस्फोट
हेही वाचा….“३० वर्षात एखाद्या गावात साधा रस्ताही गितेंनी केला नाही”, तटकरे गीतेंवर बरसले
हेही वाचा…“मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार”, मुरलीधर मोहोळ
हेही वाचा…माढ्याचं राजकारण तापलं, फडणवीसांच्या खेळीने निंबाळकर बाजी पलटणार ?