पुणे : इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार विरूद्ध पवार असा लोकसभेचा सामाना होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे संपुर्ण भारताचं लक्ष लागून राहिलं आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी थेट शरद पवार मैदानात उतरले आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा…“पैलवान कधीच म्हातारा होत नसतो”, शरद पवारांचा उल्लेख करत ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
शरद पवार, विजय शिवतारे यांच्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने सुनील तटकरे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांचे सख्खे भाऊ त्यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे एकीकडे मतदारसंघातील अडचणी वाढत असताना अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या माध्यमातून थोपटे परिवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
हेही वाचा…रणजित सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीवर भाजप ठाम ; नाराजींची नाराजी भाजप दुर कशी करणार ?
दरम्यान, भोर विधानसभा मतदारसंघातील मतं ही दोन्ही बाजूंच्या उमेदवारांना निर्णयक ठरणार आहेत. त्यामुळेच आधी सुप्रिया सुळे यांनी थोपटे यांची भेट घेतली होती. तर त्यानंतर शरद पवार , सुनेत्रा पवार आणि आता सुनील तटकरे यांनी भेट घेतली आहे.त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
महाराष्ट्रात तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात ; 48 जागा लढविणार, ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
हेही वाचा…“राज ठाकरेंचा पक्ष संपवण्याचा अदृश्य शक्तीचा प्रयत्न”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या उमेदवाराला घेरलं ; रश्मी बर्वे म्हणाल्या, “‘माझ्या विरोधात षडयंत्र”
हेही वाचा…“तोपर्यंत पुण्याची निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही”, वसंत मोरेंनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा..पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंची ताकद मिळणार ; बीडचं मैदान महायुतीच मारणार ?