पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर तर कोल्हापुरातून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकूण सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा..पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंची ताकद मिळणार ; बीडचं मैदान महायुतीच मारणार ?
कॉंग्रेसे गुरूवारी प्रसिद्ध केलेल्या यादीत कर्नाटक १७, गुजरात ११, पश्चिम बंगाल ९, राजस्थान ६ तेलंगणा ५ अरूणाचल प्रदेशमधील २ तर महाराष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा केली आहे. राजस्थानमधील सोडली ही जागा सीपीआयएमसाठी सोडली असून ५६ जागांसाठी कॉंग्रेसने उमेदवार दिले आहेत.
महाराष्ट्रातील कोल्हापुरमधून शाहू शहाजी छत्रपती, प्रणिती शिंदे यांना सोलापुरातून, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, पुण्यातून रवींद्र धंगेकर तर लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली आहे. तर सांगली मतदारसंघ हा कॉंग्रेसकडेच राहणार असे सांगितले जात होते. मात्र ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर हा मतदारसंघ आता ठाकरे गटाकडे जाणार आहे.
हेही वाचा…“पैलवान कधीच म्हातारा होत नसतो”, शरद पवारांचा उल्लेख करत ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, भंडारा-गोंदिया मतदारसंघात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चंद्रपुरमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची नावे निश्चित झाल्याचे मानले जात असतानाच कॉंग्रेसच्या जाहीर यादीत मात्र या दोघांचीही नावे नाहीत. मात्र पुण्यात आता रवींद्र धंगेकर विरूद्ध मुरलीधर मोहोळ असा सामाना निश्चित झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरे बारामतीत ; थोपटे परिवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न
महाराष्ट्रात तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात ; 48 जागा लढविणार, ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
हेही वाचा…“राज ठाकरेंचा पक्ष संपवण्याचा अदृश्य शक्तीचा प्रयत्न”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या उमेदवाराला घेरलं ; रश्मी बर्वे म्हणाल्या, “‘माझ्या विरोधात षडयंत्र”
हेही वाचा…“तोपर्यंत पुण्याची निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही”, वसंत मोरेंनी घेतला मोठा निर्णय