कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज यांची भेट घेतली होती. तर त्याआधी शरद पवार देखील शाहू महाराज यांना भेटून गेले आहेत. त्यातच आता लोकसभा निवडणुकीसाठी शाहू महाराज यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. यावर शाहू महाराज यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या उमेदवाराला घेरलं ; रश्मी बर्वे म्हणाल्या, “‘माझ्या विरोधात षडयंत्र”
कॉंग्रेसकडून तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारातून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यात स्वत:ला फार महत्व देऊ इच्छित नाही. परंतु वर्षभरापुर्वीचा माझा राजकारणात न उतरण्याचा निर्णय मला आता बदलावा लागला आहे. तेव्हा मला राजकारणात उतरण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण आता जनतेला वाटत असेल की आपण एका स्तरावर आलो आहोत. जिथे माझी आवश्यकता आहे. हीच वेळ महाराजांनी लक्ष घालण्याची आहे, असे जनतेला वाटत असावे. त्यामुळे मी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे शाहू महाराजांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…“तोपर्यंत पुण्याची निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही”, वसंत मोरेंनी घेतला मोठा निर्णय
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राला आणि कोल्हापुरला मोठा इतिहास आहे. हा छत्रपती शिवरायांपासून सुरू होतो. त्यांनी केलेले कार्य, त्या काळात त्यांनी समाजाला दिलेली दिशा, अन्यायाविरोधात त्यांचा लढा आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले काम, या सगळ्याचा आदर्श आपल्यासमोर आहे. आधुनिक काळात शाहू महाराजांनी समता आणि शिक्षणाच्यादृष्टीने महत्वाचे कार्य केले. तोच विचार कोल्हापुरच्या जनतेमध्ये रूजला आहे. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! “आता कधीच लोकसभा निवडणूक लढवणार नाही”, शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…पुण्यात धंगेकर विरूध्द मोहोळ सामाना , लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या सात उमेदवारांची घोषणा
हेही वाचा..सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरे बारामतीत ; थोपटे परिवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न
महाराष्ट्रात तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात ; 48 जागा लढविणार, ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
हेही वाचा…“राज ठाकरेंचा पक्ष संपवण्याचा अदृश्य शक्तीचा प्रयत्न”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल