जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुरूवातीला रावेर लोकसभेतून रक्षा खडसे यांचा पत्ता कट केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र भाजपने पुन्हा खडसेंवर विश्वास टाकला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेल्या एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी निवडणुक न लढण्याची भूमिका घेतली आहे.
हेही वाचा…उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून, दिल्लीतील मुक्काम आणखी वाढला
रक्षा खडसे यांच्या विरोधात रोहिणी खडसे निवडणुक लढविणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र एकनाथ खडसे यांनीच रोहिणी खडसे लोकसभेची निवडणुक लढणार नसल्याचे स्पष्ट केले. त्या विधानसभेची तयारी करीत आहेत. असे म्हणून एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत पुर्ण विराम दिलंय.
हेही वाचा…“महाराजांना राजकारणात लक्ष घालण्याची आता हीच वेळ ;” शाहू महाराजांनी स्पष्ट केली भूमिका
दरम्यान, रावेर मतदारसंघातून आमच्या कुटुंबातील उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली असली, तरी पक्षाच्या विचारधारेला बांधील राहण्यास आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली आहे. रावेर मतदारसंघात भाजपने रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवल्याच्या पार्श्वभूमीवर रोहिणी यांनी हे वक्तव्य केले आहे. रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने पराभूत करू, असा निर्धारही त्यानी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…“मला लोकसभा निवडणुक लढवायचीच नव्हती, पण…”, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं मोठं विधान
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदार शिंदे गटात दाखल
हेही वाचा…स्वरा भास्कर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ; कॉंग्रेस ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी देणार ?
हेही वाचा.‘पुण्याच्या सेवेसाठी मोहोळ हक्काचे खासदार असतील’, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विश्वास
हेही वाचा.“वेळ पडल्यास भाजपच्या कमळावर निवडणुक लढणार, पण पवारांना पाडणारच ” शिवतारे आक्रमक