पुणे : गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहेय. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असा सामाना होत असतांनाच शिंदेंच्या विजय शिवतारे यांनी निवडणुक लढविण्यावर ठाम भूमिका घेतली आहे. यातच आता आपण वेळ पडली तर बारामतीमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावरही लढू असे सांगत अजित पवार यांच्याविरोधात विजय शिवतारे यांनी दंड थोपाटले आहे. ते पुण्यात बोलत होते.
हेही वाचा…“राज ठाकरेंचा पक्ष संपवण्याचा अदृश्य शक्तीचा प्रयत्न”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजवल्यानंतरही शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात टोकाची भूमिका घेतली आहे. यातच गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी मुंबईत लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केलेल्या बैठकीतही गैरहजेरी लावली.त्यामुळे विजय शिवतारे यांच्यावर शिंदे गटाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार ? त्यावर माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली. तरी निवडणुक लढविणारवर ठाम असल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे..
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या उमेदवाराला घेरलं ; रश्मी बर्वे म्हणाल्या, “‘माझ्या विरोधात षडयंत्र”
दरम्यान, अजित पवारांनी पुरंदर तालुक्यातील जनतेचे नुकसान केले आहे. त्यामुळे मला पवार घराण्याविरोधातील मतं मिळतील,माझ्यावर शिवसेना पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई झाली तरी मी बारामतीची लोकसभा निवडणुक लढवणारच. असा थेट इशारा शिवतारे यांनी दिला आहे. तसेच मी शंभुराज देसाई यांनी माझी भूमिका सांगितली आहे. ते माझं म्हणणं एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालतील. असेही त्यांनी म्हटलेय.
READ ALSO :
हेही वाचा…उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून, दिल्लीतील मुक्काम आणखी वाढला
हेही वाचा…“महाराजांना राजकारणात लक्ष घालण्याची आता हीच वेळ ;” शाहू महाराजांनी स्पष्ट केली भूमिका
हेही वाचा…पुण्यात धंगेकर विरूध्द मोहोळ सामाना , लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या सात उमेदवारांची घोषणा
हेही वाचा..सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरे बारामतीत ; थोपटे परिवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न
महाराष्ट्रात तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात ; 48 जागा लढविणार, ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर