मुंबई : लोकसभा निवडणुक तोंडावर असताना महाविकास आघाडीत अद्यापही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाहीय. यातच महाराष्ट्रात कॉंग्रेसकडून ४८ लोकसभा मतदारसंघापैकी ०७ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिलीय. तर काही जुन्या नेत्यांचाही सामावेश यामध्ये करण्यात आला आहे. मात्र यामध्ये स्वरा भास्कर यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा..सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरे बारामतीत ; थोपटे परिवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न
संपुर्ण देशात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आलेली स्वरा भास्कर हिने रमेश चेन्नीथला यांची कॉंग्रेसच्या मुख्यालयात भेट घेतली आहे. या दोघांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी चर्चा झाली असून उमेदवारीसाठी स्वराचं नाव आघाडीवर आहे. स्वरा भास्कर मीडियावर बेधडकपणे तिची मतं मांडताना दिसते आहे. अनेकदा तिने तिच्या पोस्टद्वारे सरकारवर आणि मोदींवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रात तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात ; 48 जागा लढविणार, ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
स्वरा भास्कर हिला उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील मुंबईतील मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस स्वरा भास्कर यांच्याबाबत काय निर्णय घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, अखिल भारतीय कॉंग्रेस समितीकडून जाहीर झालेल्या कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत लातुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. शिवाजीराव काळगे, सोलापुर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवल पाडवी, कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज, अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत वानखेडे, पुणे लोकसभा मतदारसंघातून रविंद्र धंगेकर, नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलीय.
READ ALSO :
हेही वाचा.‘पुण्याच्या सेवेसाठी मोहोळ हक्काचे खासदार असतील’, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विश्वास
हेही वाचा.“वेळ पडल्यास भाजपच्या कमळावर निवडणुक लढणार, पण पवारांना पाडणारच ” शिवतारे आक्रमक
हेही वाचा…उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून, दिल्लीतील मुक्काम आणखी वाढला
हेही वाचा…“महाराजांना राजकारणात लक्ष घालण्याची आता हीच वेळ ;” शाहू महाराजांनी स्पष्ट केली भूमिका
हेही वाचा…पुण्यात धंगेकर विरूध्द मोहोळ सामाना , लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या सात उमेदवारांची घोषणा