पुणे : कॉंग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघासाठी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर कॉंग्रेस अंतर्गत नाराजी आता समोर यायला लागली आहे. मी कॉंग्रेसचा निष्ठाावंत कार्यकर्ता आहे. आताच कॉंग्रेसमध्ये आलेल्या आमदार असलेल्या व्यक्तीलाच पुन्हा उमेदवारी का ? एक व्यक्ती पद हे तत्त कुठे गेले, पक्षातील निष्ठावंतांनाच न्याय मिळणार नसल्याच न्याय यात्रेचा उपयोग काय ? असे प्रश्न कॉंग्रेसचे माजी उपमहापोर आणि लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेले आबा बागूल यांनी उपस्थित केले आहे.
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदार शिंदे गटात दाखल
पुणे लोकसभेसाठी कॉंग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आता कॉंग्रेसमधीलच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुरूवारी आबा बागूल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी बोलून दाखवली आहे. उमेदवारी जाहीर करण्यापुर्वी शहरातील ज्येष्ठांना विश्वासात घ्यायला हवे होते. अन्यायाविरोधात बोलणे म्हणजे पक्षाला विरोध नाही. गटातटाचे राजकारण बंद केले पाहिजे. असेही बागूल म्हणाले.
हेही वाचा…स्वरा भास्कर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ; कॉंग्रेस ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी देणार ?
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, माझी पुर्ण तयारी आहे. मी नाना पटोले यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना भेटून लढण्याची तयारी असल्याचे सांगितले होते. तेच तेच चेहरे किती वेळा देणार. निवडून येणारा उमेदवार पक्षाने दिला असल्याने आमच्या नाराजीचे काय फरक पडतो, असा सवाल करत बागूल यांनी मी कुणाचे जोडे उचलणार नाही अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आढळराव पाटील आज हाती घड्याळ बांधणार ; अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश ?
हेही वाचा…विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार : मुरलीधर मोहोळ
हेही वाचा..धंगेकरांचा राहुल गांधींवर विश्वास नाही का ? रवींद्र धंगेकरांच्या पोस्टवर गिरीश बापटांचा फोटो
हेही वाचा..“रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने पराभूत करू”, नणंदने भावजयाच्या विरोधात रणशिंग फुंकलं
हेही वाचा…“मला लोकसभा निवडणुक लढवायचीच नव्हती, पण…”, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं मोठं विधान