मुंबई : गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघाची संपुर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा महायुतीकडून अजित पवारांकडे आहे. मात्र या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवू पाहत आहेत. मात्र अजित पवार गटातल्याच आमदारांनी याला विरोध केल्याने हा पेच आणखी वाढला आहे. तरीही आज आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा…स्वरा भास्कर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ; कॉंग्रेस ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी देणार ?
उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिंदे गटातील शिवाजीराव आढळराव पाटलांच्या हाती घड्याळ बांधणार, अशी विश्नसनीय सुत्रांनी माहिती दिली आहे. अजित पवारांच्या बंगल्यावर सकाळी दहा वाजता हा पक्ष प्रवेश ठरला आहे. शिरूर लोकसभेतील मंत्री दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार गटाचे आजी-माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी मुंबईत बोलावलं आहे.
हेही वाचा..‘पुण्याच्या सेवेसाठी मोहोळ हक्काचे खासदार असतील’, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विश्वास
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या शिंदे गटातील शिवाजी आढळराव पाटलांच्या हाती घड्याळ बांधणार, अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. अजित पवारांच्या बंगल्यावर उद्या सकाळी दहा वाजता हा पक्षप्रवेश ठरला आहे. शिरूर लोकसभेतील मंत्री दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार गटाचे आजी-माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी मुंबईत बोलावलं आहे. आढळराव पाटील आज रात्री मुंबईला रवाना होणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार : मुरलीधर मोहोळ
हेही वाचा..धंगेकरांचा राहुल गांधींवर विश्वास नाही का ? रवींद्र धंगेकरांच्या पोस्टवर गिरीश बापटांचा फोटो
हेही वाचा..“रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने पराभूत करू”, नणंदने भावजयाच्या विरोधात रणशिंग फुंकलं
हेही वाचा…“मला लोकसभा निवडणुक लढवायचीच नव्हती, पण…”, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं मोठं विधान
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदार शिंदे गटात दाखल