पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपने विद्यमान ४ खासदारांना डच्चू दिला आहे. तर १६ विद्यमान खासदारांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र निवडणुक तोडांवर आली असता भाजपच्या विद्यमान खासदार सुस्त झाले आहे. तर नव्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. यामध्ये दिंडोरी लोकसभेच्या खासदार भारती पवार यांचा पहिला क्रमांक असल्याचे दिसून येत आहे.
बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांचं तिकीट कट करून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली. काल पंकजा मुंडे यांनी पुणे-नगर असा दौरा करत बीड जिल्ह्यात प्रचाराला सुरूवात केली. तर दुसऱ्या बाजूला चंद्रपुर लोकसभेतून सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. यातच पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तर नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या प्रचारासाठी तसेच निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभी केली आहे.
हेही वाचा..“रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने पराभूत करू”, नणंदने भावजयाच्या विरोधात रणशिंग फुंकलं
तिकडे नागपुरमध्ये नितीन गडकरी आज आपल्या प्रचाराच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती राहणार आहे. तर सांगलीत संजय काका पाटील यांनी देखील निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लावून दिले आहेत.
तर दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार असलेल्या भारती पवार सध्या प्रचारात सुस्त असल्याचे दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: सोशल मीडियावर अॅक्टीव राहतात. मात्र विद्यमान खासदार आपल्या गुर्मीत असल्याचं दिसून येत आहे. भारती पवार यांच्यासह नंदुरबारच्या खासदार हिना गावित, तसेच जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ, माढ्याचे खासदार रणजित सिंह निंबाळकर, अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील सध्या सोशल मीडियापासून लांब दिसून येत आहेत. विद्यमान खासदार आपल्याच गुर्मीत असून त्यांनी अद्याप प्रचाराचा नारळही फोडलेला दिसून येत नसल्याचे समजत आहे.
हेही वाचा…“मला लोकसभा निवडणुक लढवायचीच नव्हती, पण…”, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं मोठं विधान
दरम्यान, राज्यात प्रथमच महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामाना रंगणार आहे. राज्यात झालेले पक्ष फुट प्रकरण याचा फटका कदाचित भाजपलाही बसण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडील उमेदवारांनी प्रत्येक मतदारसंघात मोठी तयारी केल्याचे दिसून येत आहे. मात्र भाजपचे उमेदवारांची तयारी अजूनही दिसून येत नसल्याचे चित्र सध्या उमटत आहे.
READ ALSO :
हेही वाचा.भारती पवारांना मोठा धक्का बसणार, पक्षातीलच कार्यकर्ते नाराज, विरोधकांना होणार मोठा फायदा
हेही वाचा…“तेच तेच चेहरे किती वेळा देणार”, ? धंगेकरांच्या उमेदवारीनंतर कॉंग्रेसमधील नाराजी उघड
हेही वाचा…आढळराव पाटील आज हाती घड्याळ बांधणार ; अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश ?
हेही वाचा…विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार : मुरलीधर मोहोळ
हेही वाचा..धंगेकरांचा राहुल गांधींवर विश्वास नाही का ? रवींद्र धंगेकरांच्या पोस्टवर गिरीश बापटांचा फोटो