ठाणे : निवडणुका तोंडावर आल्या असतांनाही महायुतीत अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीय. आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावातून थेट दिल्लीला जाणार आहेत. यातच एका बाजुला आटापिटा करून कल्याणची जागा आपल्याकडे ठेवण्यात शिंदेंना यश आले असतांना आता ठाकरेंनी मोठी खेळी केली आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात स्व. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे यांची मोठी धाकधुकी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“तेच तेच चेहरे किती वेळा देणार”, ? धंगेकरांच्या उमेदवारीनंतर कॉंग्रेसमधील नाराजी उघड
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना २० जागा देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये कल्याण लोकसभेची जागा ही ठाकरेंच्या हिटलिस्टवर आली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी केदार दिघे यांना निवडणुकीत उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ठाकरेंची ही चाल आता एकनाथ शिंदे कशी काय परतून लावणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून विद्यमान खासदार राजन विचारे लढतील असे सांगण्यात येत आहे. तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. यातच कल्याण लोकसभा मतदारसंघात याआधी भाजप आणि शिंदे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळाली आहे. याच दरम्यान भाजपच्या काही नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचंही दिसून आलं. त्याचाच फायदा ठाकरे उचलू शकतात. असा कयास मांडला जात आहे.
हेही वाचा…आढळराव पाटील आज हाती घड्याळ बांधणार ; अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश ?
दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघातून कधी आदित्य ठाकरे तर कधी सुषमा अंधारे लढतील अशी चर्चा होती. मात्र यावर आता केदार दिघे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. कल्याणमध्ये आनंद दिघे यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना केदार दिघेंचं कडवं आव्हान असणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकर ; ठाकरे दुसरा पत्ता काढण्याच्या तयारीत
हेही वाचा…शिवतारेंनी अजित पवारांना खिंडित गाठलं, शिंदे शिवतारेंवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत
हेही वाचा…आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश ठरला ; प्रचाराचा नाराळ या दिवशी फोडणार
नव्या उमेदवारांनी घेतली आघाडी, प्रचारात विद्यमान मात्र सुस्त, भाजपच्या उमेदवारांची वेगळीच दशा
हेही वाचा.भारती पवारांना मोठा धक्का बसणार, पक्षातीलच कार्यकर्ते नाराज, विरोधकांना होणार मोठा फायदा