IMPIMP

उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकर ; ठाकरे दुसरा पत्ता काढण्याच्या तयारीत

Tejashwi Ghosalkar Thackeray preparing to contest another address against Piyush Goyal from North Mumbai

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीकरीता जिंकण्याची शक्यता असलेल्या आणि सक्षम उमेदवारांनाच उमेदवारी देण्याचा दोन्ही बाजूंनी केला जात आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीय. मात्र त्याआधी योग्य उमेदवारांची चाचपणी केली आहे. अशातच आता गोळीबारात हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा…आढळराव पाटील आज हाती घड्याळ बांधणार ; अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश ?

अलिकडेच फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळीबारात ठाकरे गटात असलेले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती. यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली होती.

दिवंगत अभिषेक घोसाळकर हे ठाकरे यांचे समर्थक होते. ते शिवसेनेचे माजी नगरसेवकही राहिलेले आहेत. त्यामुळे राजकीय दृष्टीने बघायचे झाल्यास घोसाळकर यांचा चांगला जनसंपर्क होता. उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना तिकीट दिल्यास त्यांना मतदारांची सहानुभूती मिळू शकते. तसेच झाल्यास तेजस्वी घोसाळकर यांचा विजय सुकर होऊ शकतो. असाच विचार ठाकरेंचा असावा.

हेही वाचा…विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार : मुरलीधर मोहोळ 

दरम्यान, भाजपने लोकसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली तर पियुष गोयल यांना मोठं आव्हान ठरू शकते.

READ ALSO :

हेही वाचा…शिवतारेंनी अजित पवारांना खिंडित गाठलं, शिंदे शिवतारेंवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

हेही वाचा…आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश ठरला ; प्रचाराचा नाराळ या दिवशी फोडणार

नव्या उमेदवारांनी घेतली आघाडी, प्रचारात विद्यमान मात्र सुस्त, भाजपच्या उमेदवारांची वेगळीच दशा

हेही वाचा.भारती पवारांना मोठा धक्का बसणार, पक्षातीलच कार्यकर्ते नाराज, विरोधकांना होणार मोठा फायदा

हेही वाचा…“तेच तेच चेहरे किती वेळा देणार”, ? धंगेकरांच्या उमेदवारीनंतर कॉंग्रेसमधील नाराजी उघड 

Total
0
Shares
Previous Article
Shivtare has reached the point of Ajit Pawar Shinde is preparing to take a big action against Shivtare

शिवतारेंनी अजित पवारांना खिंडित गाठलं, शिंदे शिवतारेंवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

Next Article
Thackeray's move to encircle Eknath Shinde in a fort will ignite Kedar Dighe's torch against Srikant Shinde

एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात घेरण्याची ठाकरेंची चाल ; श्रीकांत शिंदेंच्या विरोधात केदार दिघे मशाल पेटवणार ?

Related Posts
Total
0
Share