IMPIMP

शिवतारेंनी अजित पवारांना खिंडित गाठलं, शिंदे शिवतारेंवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

Shivtare has reached the point of Ajit Pawar Shinde is preparing to take a big action against Shivtare

बारामती : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अर्वाच्च भाषेत अजित पवारांनी टिका केल्याचा व पाडल्याचा राग शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी मनात ठेवला आहे. त्यामुळेच आता लोकसभेला पवार कुटुंबात एकटे पडलेल्या अजित पवारांना खिंडित गाठण्यासाठी कंबर कसली आहे. आज विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातील हर्षवर्धन पाटलांना भेटणार आहे. त्यामुळे अजित पवार गटची धाकधुक वाढल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा…विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार : मुरलीधर मोहोळ 

शिवतारे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर महायुतीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवतारे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. अशातच शिवतारेंनी पक्षविरोधी कृत्ये केल्याने त्यांची हकालपट्टी करण्याचा दबाव शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वाढू लागला आहे.

दरम्यान, अजित पवारांनी शिवतारेंवर भाष्य करताना महायुतीत वातावरण बिघडायला नको म्हणून शांत असल्याचे म्हटले होते. यापुर्वी पवारांनी फडणवीस यांची भेट घेत बारामतीत शिवतारेंच्या बंडाची तक्रार केली होती. यानंतर शिंदे यांनी शिवतारेंना बोलवून समज दिली होती.

हेही वाचा..धंगेकरांचा राहुल गांधींवर विश्वास नाही का ? रवींद्र धंगेकरांच्या पोस्टवर गिरीश बापटांचा फोटो

तरीही शिवतारे लोकसभा लढविण्यावर ठाम असून उघडपणे मोर्चेबांधणी, गाठीभेटी घेत आहेत. अखेर शिवतारेंवर कारवाई करण्याच्या सुचना शिवसेनेत आल्या असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई शिवतारे यांच्यावर केलेली नाही.

READ ALSO :

हेही वाचा…आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश ठरला ; प्रचाराचा नाराळ या दिवशी फोडणार

नव्या उमेदवारांनी घेतली आघाडी, प्रचारात विद्यमान मात्र सुस्त, भाजपच्या उमेदवारांची वेगळीच दशा

हेही वाचा.भारती पवारांना मोठा धक्का बसणार, पक्षातीलच कार्यकर्ते नाराज, विरोधकांना होणार मोठा फायदा

हेही वाचा…“तेच तेच चेहरे किती वेळा देणार”, ? धंगेकरांच्या उमेदवारीनंतर कॉंग्रेसमधील नाराजी उघड 

हेही वाचा…आढळराव पाटील आज हाती घड्याळ बांधणार ; अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश ?

Total
0
Shares
Previous Article
Adharao Patal's party entry into NCP was confirmed; The campaign will burst on this day

आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश ठरला ; प्रचाराचा नाराळ या दिवशी फोडणार

Next Article
Tejashwi Ghosalkar Thackeray preparing to contest another address against Piyush Goyal from North Mumbai

उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकर ; ठाकरे दुसरा पत्ता काढण्याच्या तयारीत

Related Posts
Total
0
Share