नागपुर : गेल्या काही दिवसापासून चंद्रपुर लोकसभा मतदारसंघावरून कॉंग्रेसमध्येच अंतर्गत वाद उफाळून आला आहे. चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. तर दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर देखील निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. यातच आता वडेट्टीवार यांनी मोठा आरोप केला आहे.
हेही वाचा…भारती पवारांना मोठा धक्का बसणार, पक्षातीलच कार्यकर्ते नाराज, विरोधकांना होणार मोठा फायदा
विजय वडेट्टीवार म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये जात-पात कधी पाहिली जात नाही, परंतु, आमच्यातील काही स्वार्थी लोक विषारी प्रचार करत आहे. मी कधी जातीय द्वेष केला नाही. ज्या काही माझ्या विरोधात समाज माध्यमावर पोस्ट व्हायरल केल्या आहेत. ते मला बदनाम करण्यासाठी असून त्यांची नावे लवकरच समोर आणणार असल्याचे मत वडेट्टीवारांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा…“तेच तेच चेहरे किती वेळा देणार”, ? धंगेकरांच्या उमेदवारीनंतर कॉंग्रेसमधील नाराजी उघड
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आमच्यातील पाच दहा लोकांचे टोळके हे धंदे करत असतात. बाळू धानोरकरला तिकीट कशी मिळवून दिली आहे? हे सगळ्या लोकांना माहीत आहे. अडबाले याना उमेदवारी मिळणार नव्हती. ती मी मिळवून दिली. आता हेच लोक माझ्या विरोधात जातीय पोस्ट व्हायरल करत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.
READ ALSO :
हेही वाचा..एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात घेरण्याची ठाकरेंची चाल ; श्रीकांत शिंदेंच्या विरोधात केदार दिघे मशाल पेटवणार ?
हेही वाचा…उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकर ; ठाकरे दुसरा पत्ता काढण्याच्या तयारीत
हेही वाचा…शिवतारेंनी अजित पवारांना खिंडित गाठलं, शिंदे शिवतारेंवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत
हेही वाचा…आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश ठरला ; प्रचाराचा नाराळ या दिवशी फोडणार
नव्या उमेदवारांनी घेतली आघाडी, प्रचारात विद्यमान मात्र सुस्त, भाजपच्या उमेदवारांची वेगळीच दशा